India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकच्या ईएसडीएस कंपनीने शेतकऱ्यांसाठी आणले ‘फामृत’ अॅप

India Darpan by India Darpan
October 18, 2021
in वाणिज्य
0
नाशिकच्या ईएसडीएस कंपनीने शेतकऱ्यांसाठी आणले ‘फामृत’ अॅप
0
SHARES
60
VIEWS
WhatAppShare on FacebookShare on Twitter

नाशिक – भारतातील अग्रगण्य क्लाउड सर्व्हिस आणि एन्ड-टू-एन्ड मल्टि-क्लाऊडआवश्यकतेबाबत सेवा पुरविणाऱ्या आस्थपानांपैकी एक ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स लिमिटेड यांनी त्यांचे डिजिटल प्लॅटफॉर्म ‘फामृत’
चे त्यांच्या नाशिक येथील डेटा सेंटर मध्ये अनावरण केले.

फामृतचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी मदत करणे आहे व त्यांना त्यांच्या शेती उद्योगाशी संबंधित असलेल्या भागधारकांशी जोडून योग्य महसूल मिळवून देणे हे आहे. फामृतच्या माध्यमातून आमचे लक्ष्य देशभरातील शेतकरी बांधवांना शेती उद्योगाचे समाधान पोहचविणे हे आहे.

अपुरी संसाधने, बाजारपेठांशी थेट जोडले गेलेले नसणे, पिकांच्या उत्पादनावर परिणाम करणारी डळमळीत हवामान परिस्थिती आणि शेती उद्योगात मानवी श्रमांचे वाढलेले तास या बहुसंख्य शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या काही अडचणी आहेत. ईएसडीएसचे फामृत शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीच्या कृषीशास्त्रज्ञांशी जोडण्यास सक्षम करेल तसेच बँकिंग आणि विमा उत्पादनांची सुलभता, बाजार आणि पीक आणि गुरांचे व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स आदी बाबतीत सहाय्य करेल.

फामृत ऍपच्या अनावरणाच्या वेळी बोलताना ईएसडीएसचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्री.पियुष सोमाणी म्हणाले, “आम्हाला फामृत ऍप डेव्हलप करणाऱ्या ईएसडीएस मधील संपूर्ण टीमचा खूप अभिमान आहे. फामृत ऍप डेव्हलप करतांना शेतकरी बांधवांच्या दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या समस्या व त्यासाठी समाधान उपलब्ध करून देणे या बाबी ध्यानात ठेवल्या आहेत.” पियुष सोमाणी पुढे म्हणाले “फामृत ऍप हे शेतकऱ्यांच्या समस्यांवर समाधानासाठी आहे. आमची तंत्रज्ञानावर चालणारी कंपनी आणि तंत्रज्ञानाचा सतत वापर करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. फामृत ऍप ही कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील आमची पहिली पायरी आहे, आणि आमचे ध्येय आहे या उपक्रमाद्वारे शेतकरी, सहकारी संस्था तसेच सरकार यांची मदत करणे!”

याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना, स्पॉकहब चे प्रमुख श्री किशोर शाह म्हणाले, “आमच्या टीमने फामृत ऍप विकसित करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, आणि हे उत्पादन अखेरीस लाँच होत आहे हे पाहून आम्ही सर्व आज आनंदित आहोत. फामृत हे आमच्या शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त साधन आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे काम त्यांच्या क्षेत्रात सुलभ करणे आणि इकोसिस्टिमद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. फामृत त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित केले आहे. जमिनीवरील संशोधनासह, कृषी क्षेत्रातील विविध तज्ञांकडून इनपुट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे मिश्रण याआधारे, फामृत तयार केले गेले आहे.”

ह्या प्रसंगी मा. श्री. शिवाजी आमले (उप-आयुक्त नाशिक महानगरपालिका), मा. डॉ. सत्येंद्र सिंग (उप-संचालक NHRDF), डॉ. शशीताई आहिरे (अध्यक्ष सहकार भारती, महाराष्ट्र राज्य), मा. श्री. अजयजी ब्रम्हेचा (उप-अध्यक्ष सहकार भारती, महाराष्ट्र राज्य, संचालक महाराष्ट्र राज्य बँक फेडरेशन), मा. श्री. धीरज चौधरी (मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँक), मा. श्री. संजय पेंढारे (State Co-ordinator Formalization Micro Enterprise), मा. श्री. सतीश माथूर (मुख्य कार्यकारी अधिकारी – PINC इन्शुरन्स), मा. श्री. सुधाकर खाडे (शेतकरी) इ. मान्यवर उपस्थित होते.

फामृत बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया भेट द्या : https://famrut.co.in/index.html

सोशल मीडिया वर फामरुत पेजेस –
फेसबुक – https://www.facebook.com/SPOCHUBOfficial/
लिंक्डइन – https://www.linkedin.com/company/spochubofficial
यूट्यूब – https://www.youtube.com/channel/UCMQLT_BnlYX9cj1wZJTxWbQ
इन्स्टाग्राम – https://twitter.com/SpocHubOfficial/

पुढील मदतीसाठी तुम्ही आमच्याशी 1800 209 3006 वर किंवा [email protected] वर ईमेल करू शकता. आमची टीम तुम्हाला मदत करण्यात उत्साही आहे.

 

Previous Post

नाशिक शहरात बुधवारी (२० ऑक्टोबर) या भागात पाणी नाही

Next Post

सिन्नर मार्गावरील हॉटेलवर छापा; ८५ हजाराचा मदयसाठा जप्त

Next Post
मद्य तस्करीचा संबध नगरच्या दिशेने, मोठ्या साखर कारखान्याची होणार तपासणी

सिन्नर मार्गावरील हॉटेलवर छापा; ८५ हजाराचा मदयसाठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

May 23, 2022
चालबाज चीनचा हा डाव उघड

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

May 23, 2022
कोरोना आणि सोशल मिडिया

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

May 23, 2022
हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि शेठजी

May 23, 2022
….आता रोजचे वाढदिवसही कळेल

आज आहेत या मान्यवरांचे वाढदिवस – २४ मे २०२२

May 23, 2022
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस वाचा, २४ मे चे राशिभविष्य

May 23, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group