नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाजारात सर्वसाधारणपणे अनेक हेल्मेट उपलब्ध आहेत. मात्र, येथील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट हेल्मेट विकसित केले आहे. मेट कॉलेजच्या इलेक्ट्रिक विभागाच्या अंतिम वर्षातील हे विद्यार्थी आहेत. या स्मार्ट हेल्मेटची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
म्हणून हेल्मेट आवश्यक
जागतिक लोकसंख्येचा विचार करता भारत देश हा लोकसंख्येच्या क्रमवारीत अग्रस्थानी आहे. भारतातील बहुसंख्यक लोक हे आर्थिक निकषानुसार मध्यमवर्गीय प्रवर्गात येतात या कारणामुळे दुचाकी वापरातही भारत देश हा अव्वलस्थानी आहे. गेल्या काही वर्षापासुन अपघातांची आकडेवारी बघता झोपेमुळे, मद्य प्राशनामुळे व वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे दुचाकी अपघाताचे प्रमाण सर्वाधिक नोदविण्यात आले आहे तसेच यात मृत्युचे व कायमस्वरूपी अपंगत्वाचे प्रमाण ही अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या विद्यार्थ्यांना यश
रस्ते अपघात रोखणे आणि हेल्मेटची सुरक्षा वाढावी यासाठी विद्युत विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी कु. सायली गटकळ, कु. सोनाली बेडसे, चि. संचित निरगुडे यानी स्मार्ट हेल्मेट बनविले आहे. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. डी. पी कदम, यांचे मागदर्शन लाभले. तसेच प्राचार्य डॉ. वी. पी. वाणी व महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यानी प्रोत्साहन देऊन कौतुक केले.
हेल्मेटची वैशिष्ट्ये
या हेल्मेटचे वैशिष्य म्हणजे चालकाने स्मार्ट हेल्मेट घातले नाही किंवा मद्यपान करून वाहन चालवण्याचा प्रयत्न केला तर वाहन सुरुच होत नाही.
वाहन चालवताना चालकाला झोप लागत असल्यास चालकास स्मार्ट हेल्मेट अलार्म देते
चालकाला डुलकी लागत असल्यास वाहन आपोआप थांबविते
स्मार्ट हेलमेटच्या या अविष्कारामुळे येणाऱ्या काळात दुचाकी अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतील
या स्मार्ट हेल्मेटमुळे दुचाकी चालकांचे प्राण वाचतील
या प्रकल्पामुळे सोशल इंजिनियरींगशी विद्यार्थी जोडले जातील.
Nashik Engineering Students Smart Helmet