नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गव्हाचे उभे पिक पेटवून देत आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी नाणेगाव ता.जि.नाशिक येथील ११ जणांविरूध्द देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात ही घटना घडली होती. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आहे.
फशाबाई अशोक रोकडे, अशोक बाबुराव रोकडे, संजय नाना रोकडे, सोमनाथ नाना रोकडे, सुनिल केरू रोकडे, योगेश अशोक रोकडे, भानूदास अशोक रोकडे, नामदेव अशोक रोकडे, योगिता सोमनाथ रोकडे, सविता भानुदास रोकडे (रा.सर्व नाणेगाव ता.जि.नाशिक) व शरद फकिरा कासार (रा.शेवगे दारणा ता.जि.नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संदिप पोपट रोकडे (३६ रा.नानेगाव ता.जि.नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
संदिप रोकडे यांच्या मालकीच्या सर्व्हे नं. ४२७ (१) या शेतजमिनीतील गहू पिक गेल्या वर्षी १ जून रोजी अज्ञातांनी पेटवून दिले होते. उभे पिक पेटवून दिल्याने संदिप रोकडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. याबाबत त्यांनी संशयितांनी नुकसान केल्याचा आरोप करीत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.
मेहरधाम भागात घरफोडी
पेठरोडवरील मेहरधाम भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५८ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनार्दन विष्णू अलगट (रा.सर्वज्ञ रो हाऊस,मेहरधाम ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अलगट कुटूंबिय रविवारी (दि.२२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली ३० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५८ हजार ३४० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.
Nashik Crime Wheat Crop Burn Court Order Action