India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नंदुरबारकरांनो, होऊ द्या आवाज! जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनीक्षेपकाबाबत काढले हे आदेश

India Darpan by India Darpan
January 24, 2023
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण ) नियम 2000 नुसार श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यासाठी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षांमध्ये 15 दिवस सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्याबाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आदेशित केल्याचे एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात 2023 यावर्षात 10 मार्च शिवजयंती (तिथीनुसार), 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 29 जुलै मोहरम (ताजिया), 23 सप्टेंबर (गौरी विसर्जन) पाचवा दिवस, 25 सप्टेंबर (सातवा दिवस), 27 सप्टेंबर, (नववा दिवस ), 28 सप्टेंबर (अनंत चर्तुदशी) असे गणेशोत्सावाचे चार दिवस, 22 व 23 ऑक्टोबर नवरात्र उत्सव, 12 नोव्हेंबर (लक्ष्मीपूजन) , 25 डिसेंबर ख्रिसमस, 31 डिसेंबर आणि उर्वरीत 3 दिवस शासनाच्या महत्वाच्या सण, उत्सव व कार्यक्रमासाठी राखीव असतील.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार ध्वनिक्षेपकाचा आवाज ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण ) नियम 2000 मधील विहित मर्यादेच्या आत ठेवावा. ध्वनीक्षेपण रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत करता येईल. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. ध्वनीक्षेपकाचा वापर करताना आक्षेपार्ह ध्वनीक्षेपण करु नये, तसेच कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ध्वनीक्षेपकाची ध्वनीमर्यादा ही 45 डेसीबल पेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) मधील तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

ध्वनीक्षेपनाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास ध्वनीक्षेपण परवानगी कोणतीही पुर्वसूचना न देता रद्द करणेत येईल. ध्वनीक्षेपण परवानगीत बदल करण्याचा अगर परवानगीत रद्द करण्याचा अधिकार जिल्हादंडाधिकारी नंदुरबार यांनी राखून ठेवले आहे. तसेच कोविड-19 विषाणुंचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ नये याकरिता जिल्हा प्राधिकरणाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून पारीत केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Nandurbar Collector Order on Sound Permission Days


Previous Post

नाशिकमध्ये गुंडगिरीला ऊत; सिडकोमध्ये विद्यार्थ्याला टवाळखोरांची भरदिवसा बेदम मारहाण

Next Post

गव्हाचे उभे पिक जाळले, अखेर न्यायालयाच्या आदेशाने झाली ही कारवाई

Next Post

गव्हाचे उभे पिक जाळले, अखेर न्यायालयाच्या आदेशाने झाली ही कारवाई

ताज्या बातम्या

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group