नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ब्लॅकमेल करणाऱ्या दाम्पत्याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस वेश्या व्यवसायास लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साफसफाईची नोकरी देत भामट्यांनी गुंगीचे औषध पाजून हे कृत्य केले असून, अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पती पाठोपाठ आर्थिक फायद्यासाठी एका ग्राहकांस पाठवून पिडीतेवर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तीघांविरूध्द बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित दांम्पत्याविरोधात वेगवेगळ््या पोलिस ठाण्यात फसवणुकीसह पिटाअंतर्गत गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वीच पंचवटी पोलिस ठाण्यात याचप्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुशबू सुराणा आणि परेश सुराणा व अन्य एक ग्राहक असे संशयितांची नावे आहे. सातपूर परिसरातील ११ वीचे शिक्षण घेणाºया पिडीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पिडीतेच्या कुटूंबियांची आर्थिक परिस्थिती हलाखीच्या असल्याने ती उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमिवर १ मार्च २०२३ रोजी नोकरीच्या शोधार्थ घराबाहेर पडली होती.
शरणपूररोडवरील टिळवाडी सिग्नल परिसरातील एका बिल्डींगवर तिला योगा वेलनेस स्पा येथे कामास मुली पाहिजे असा बोर्ड बघून ती नोकरीची विचारणा करण्यासाठी गेली असता ही घटना घडली. काऊंटरवर बसलेल्या महिला आणि पुरूषाने कौटूंबिक परिस्थिती जाणून घेत पिडीतेस तीन हजार रूपये पगार देण्याचे मान्य करीत तिला साफ साफाई चे काम करण्यासाठी कामावर ठेवले. यावेळी मुलीने महिलेचे नाव विचारले असता तीने खुशबू सुराणा सांगितले. दुसºया दिवशी मुलगी कामावर गेली असता सदर महिला व पुरूषाने तिला खुर्चीवर बसवित ज्युस पाजले.
या ज्युसमध्ये गुंगीचे औषध टाकण्यात आल्याचा आरोप पिडीतेने केला असून शुध्दीवर आल्यानंतर ती दुसºया रूममध्ये सदर व्यक्तीबरोबर होती. या ठिकाणी सदर महिला दोघांचे अश्लिल चित्रीकरण करीत होती. संशयितांनी सदरचे चित्रीकरण दाखवत या घटनेची वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने मुलगी भेदरलेल्या अवस्थेत रडत असतांना अन्य एका ग्राहकानेही येवून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने कसे बसे घर गाठून सावरल्यानंतर आपल्या आईकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. अधिक तपास निरीक्षक बंडेवाड करीत आहेत.
दरम्यान संशयित सुराणा दांम्पत्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात फसवणुकीसह वेश्या व्यवसाय आणि मानवी तस्करी सारखे गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात असून काही दिवसांपूर्वीच हिरावाडीतील २१ वर्षीय पिडीतेच्या तक्रारीवरून याचप्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ते अद्याप फरार आहेत. या घटनेपूर्वीच या दांम्पत्याने एका राजकिय पदाधिकाºयास बलात्काराचा गंभीर गुह्यात अडकविल्याचे समजते. संशयित दांम्पत्याने शहरातील अनेक महिला मुलींना वाम मार्गाला लावल्याची चर्चा असून ते राजरोसपणे वावरत असतांनाही पोलिसांच्या हाती लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Nashik Crime Surana Couple Minor Girl