नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोडवरील तारवाला नगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात दीड लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोककुमार विठ्ठलराव दोंदे (रा.सृष्टीपार्क तारवालानगर,लोखंडे मळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दोंदे कुटुंबिय रविवारी (दि.८) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली.
अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली दीड लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख १० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.