नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्लॉट खरेदी विक्री व्यवसायात एकाने आठ लाख रूपयांची फसवणुक केली. व्यवहार पूर्ण न केल्याने भूंखड खरेदीदाराने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल (बंटी) शरद कोळी (रा.लखन हौ.सोसा वृंदावननगर,जत्रा हॉटेलमागे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्लॉट विक्रेत्याचे नाव आहे. याबाबत कुणाल दयाराम रायते (रा.सुखसागर अपा.शिवरामनगर जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. रायते यांनी जून २०२४ मध्ये संशयिताकडून आडगाव शिवारातील गट नं. ३४३ – १ पैकी प्लॉट नं. ३९ यासी क्षेत्र २००.८१ चौमी. या भूखंडाचा व्यवहार केला.
५५ लाख रूपयांना हा व्यवहार ठरल्याने रायते यांनी कोळी यांना ८ लाख १ हजाराची रक्कम ऑनलाईन पध्दतीने अदा केली होती. उवर्रीत रकमेपोटी धनादेश देण्यात आल्या होत्या. मात्र कोळी यांनी व्यवहार पूर्ण न करता धनादेश टाकून ते बाऊन्स केले. यामुळे रायते यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक निकम करीत आहेत.