इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक दौ-यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी आज भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे खा. संजय राऊत नाशिकमध्ये असतांना ही भेट झाल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस रविवार पासून नाशिक दौ-यावर आहे. काल त्यांनी विविध कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी ते त्यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्याला गेले. त्यानंतर त्यांच्या हस्ते साईबाबा हॅास्पिटलचे उदघाटन झाले. या सोहळ्यातच बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या.
या भेटीबाबत सुधाकर बडगुजर यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या दृष्टीने रिक्त पदे भरावी, काही क्लास वन आणि क्लास टू, क्लास थ्री आणि क्लास फोरचे प्रमोशन बाकी आहे. ते प्रमोशन लवकर व्हावे याबाबत निवेदन देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार हे संजय राऊतसह सर्वांना माहित असल्याचे त्यांनी सांगितले.