नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लग्नाचे आमिष दाखवून एकाने महिलेस फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन वर्षे लीव अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहणा-या संशयिताने सहा महिन्यांच्या मुलीसह तिच्या आईस सांभाळण्यास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबोली ता. त्र्यंबकेश्वर येथील ३६ वर्षीय व्यक्तीविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर येथील आंबडेकर चौक भाजी मार्केट भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. सन.२०२१ मध्ये पीडितेची संशयिताशी ओळख झाली होती. ओळखीतून दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने ही घटना घडली.
संशयिताने लग्नाचे आमिष दाखविल्याने दोघे तीन वर्षापासून लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहत होते. कायदेशीर लग्न न करता एकत्रीत राहत असल्याने दोघांमध्ये शारिरीक संबध निर्माण झाले. सहा महिन्यांपूर्वीच पीडितेने गोंडस मुलीस जन्म दिला असून दोघा मायलेकींना अधिकृतपणे सांभाळण्यास संशयिताने नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. अधिक तपास उपनिरक्षक सुहासिनी बारेला करीत आहेत.