सुदर्शन सारडा
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये ग्रामीण मधील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुशंगाने स्थानिक गुन्हे षाखा, निफाड व एम.आय.डी.सी. सिन्नर पोलीसांचे पथकांनी निफाड, सिन्नर एम.आय.डी.सी. व ओझर परिसरात अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री व वाहतुक करणारे इसमांवर छापे टाकून कारवाई केली आ
खालील ठिकाणी गांजा जप्त करून कारवाई केली.
1) गाजरवाडी, ता.निफाड परिसरात 09 किलो 263 ग्रॅम गांजा जप्त – एक आरोपी अटक
दिनांक 27/05/2025 रोजी निफाड पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. गणेष गुरव यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे, गाजरवाडी, षिंदे वस्ती परिसरात एक इमस अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे निफाड पोलीसांनी षिंदे वस्ती, गाजरवाडी परिसरात छापा टाकून इसम नामे गिरीश षरद षिंदे, वय 22, रा. गाजरवाडी, षिंदे वस्ती, ता.निफाड, जि.नाषिक यास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातुन 1,85,260/- रू. किं. चा 09 किलो 263 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेषीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करतांना मिळुन आला असुन त्याचेविरूध्द निफाड पोलीस ठाणे येथे गुरनं 167/2025 एन.डी.पी.एस. कायदा कलम 8(क), 20(ब), ।।(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2) नाशिक – पुणे महामार्गावर मोहदरी घाट परिसरात अवैधरित्या गांजाची विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणारे दोघे ताब्यात.
दिनांक 26/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे षाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे, नाषिक ते पुणे महामार्गावर सिन्नर षहराच्या दिषेने एक दुचाकीवर दोन इसम अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीषीर माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नाषिक ते पुणे मोहदरी घाटात सापळा रचुन, एक स्प्लेंडर मोटर सायकल वरील इसम नामे 1) अरबाज नासीर पठाण, वय 22, रा. सुकदेव नगर, पाथर्डी गाव, नाषिक, 2) किरण मानप्पा बडगेर, वय 23, रा. पवार हाउस, अंबड, नाषिक यांना ताब्यात घेतले. सदर इसमांचे कब्जातुन 59,200/- रू. किं. चा 02 किलो 960 ग्रॅम वजनाचा गांजा व स्प्लेंडर मोटर सायकल असा एकुण 90,200/- रूपये किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसम हे विनापरवाना बेकायदेषीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करण्याचे उद्देषाने वाहतुक करतांना मिळुन आले असुन त्यांचेविरूध्द एम.आय.डी.सी. सिन्नर पोलीस ठाणे येथे गुरनं 168/2025 एन.डी.पी.एस. कायदा कलम 8(क), 20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3) ओझर शहरात अवैधरित्या गांजाची विक्री करणारा इसम ताब्यात –
दिनांक 27/05/2025 रोजी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे, ओझर षहरातील महात्मा फुले चौक परिसरात एक इमस अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थागुषाचे पथकाने ओझर शहरातील महात्मा फुले चौक, भिलाटी परिसरात छापा टाकून इसम नामे भाऊसाहेब सिताराम बंदरे, वय 44, रा. महात्मा फुले चौक, भिलाटी, ओझर, ता.निफाड, जि.नाषिक यास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातुन 49,280/- रू. किं. चा 02 किलो 463 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेषीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करतांना मिळुन आला असुन त्याचेविरूध्द ओझर पोलीस ठाणे येथे गुरनं 130/2025 एन.डी.पी.एस. कायदा कलम 8(क), 20(ब), ।।(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग हरिश खेडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग श्री. निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, निफाड पो.स्टे. पोलीस निरीक्षक गणेश गुरव, ओझरचे पोलिस निरीक्षक समीर केदार,पो कॉ/ नितीन जाधव,जितू बागुल,राजेंद्र डंबाले,भास्कर जाधव,पो.ना/ दुर्गेश बैरागी,मदने, एम.आय.डी.सी. सिन्नर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद पाटील, सपोनि जितेंद्र पाटील स्थागुषाचे सपोनि संदेष पवार, पोउनि प्रकाश भालेराव, पोउनि हर्शल भोळे, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे, किशोर खराटे, चेतन संवत्सरकर, विनोद टिळे,मनोज सानप,योगिता काकड, ललिता शिरसाठ, अस्मिता मढवई, तसेच निफाड पोलीस ठाणे कडील सपोनि ईश्वर पाटील, पोहवा अनिल शेरेकर, किरण ढेकळे, विनोद जाधव, रंगनाथ सानप, पोना नितीन सांगळे, पोकॉ राजु दरोडे, विक्रम लहाने, सोनाली शिंदे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम तसेच एम.आय.डी.सी. सिन्नर पो.स्टे. चे पोलीस अंमलदार योगेष षिंदे, प्रकाष उंबरकर, नवनाथ चकोर, जयेश खाडे, भूषण रानडे यांचे पथकाने वरील प्रमाणे कारवाई केली आहे.