नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याबाबत गंगापूर, मुंबईनाका,सातपूर,उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होवू लागली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूररोडवरील इश्वर गोपाल पाटील (रा.पंपीगस्टेशन,गंगापूररोड) यांची स्प्लेंडर एमएच १८ एव्ही ९३५८ गेल्या सोमवारी (दि.१२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत. दुसरी घटना पखालरोडवरील हॅपी होम कॉलनीत घडली. नविद अजिज देशमुख (रा. दया अपा. हॅपी होम कॉळनी पखालरोड) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. देशमुख यांची स्प्लेंडर एमच १५ डीडी ७६३८ मोटारसायकल मंगळवारी (दि.१३) रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गोडे करीत आहेत. तिसरी घटना सातपूर औद्योगीक वसाहतीत घडली. याबाबत राहूल शामराव पवार (रा.अंजनेरी ता.त्र्यंबकेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. पवार गेल्या ३ मे रोजी शहरात आले होते. महिन्द्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या प्रवशद्वाराजवळ लावलेली त्यांची एमएच १५ एचडब्ल्यू ४८२९ मोटारसाकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.
चौथी घटना नाशिकरोड येथील छत्रपती कॉलनी भागात घडली. ओमकार देवदत्त कुलर्णी (रा.मनिषा अपा.नवीन स्टेट बँकेजवळ छत्रपती कॉलनी,ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. कुलकर्णी यांची पल्सर एमएच १५ एफजी ८८२१ गुरूवारी (दि.१५) रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत. तर शिंगवे बहुला येथील अनिल शंकर जाधव यांची एमएच १५ केए ४०५० ही मोटारसायकल गेल्या रविवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील सिंधी पंचायत हॉल परिसरात लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सिध्दपुरे करीत आहेत.