नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पत्र्याच्या शेडमध्ये करंट उतरल्याने ही घटना घडली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रदिप तानाजी ताजनपुरे (रा.ताजनपूरे मळा,पॉलिटेक्नीक कॉलेजसमोर,चेहडी बु.) असे मृत इसमाचे नाव आहे. ताजनपुरे रविवारी (दि.११) सकाळच्या सुमारास आपल्या घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये वाहन धुवत असतांना ही घटना घडली. पत्र्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रीक करंट उतरल्याने ताजनपुरे यांना शॉक बसला. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही राजरोसपणे शहरात वावरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने ही कारवाई पाथर्डीफाटा भागात केली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश तुळशीराम लिपणे (२३ रा.आनंदनगर,पाथर्डी शिवार) असे अटक करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. लिपणे याच्या गुन्हेगारी कृत्यास रोखण्यासाठी शहर पोलीसांकडून त्याच्याविरूध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहर जिह्यातून त्यास दोन वर्षासाठी तडिपार केलेला असतांनाही त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना रविवारी (दि.११) तो आनंदनगर येथील समृध्दी प्लाझा या इमारतीसमोरील मोकळ््या जागेत मिळून आला. याबाबत हवालदार परमेश्वर दराडे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.