नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या दोघा तडिपारांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. जुने नाशिक परिसरातील वेगवेगळया भागात दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम राजेंद्र सासे (२४ रा. वीर सावरकरचौक भोई गल्ली अमरधामरोड भद्रकाली) व विकी शांताराम जावरे (२१ रा. शिवशक्ती नगर,आगरटाकळी ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपारांची नावे आहेत. संशयितांच्या गुन्हेगारी कृत्यास आळा घालण्यासाठी शहर पोलीसांनी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. अनुक्रमे १८ महिने व एक वर्ष कालावधीसाठी त्यांना शहर व जिह्यातून हद्दपार केलेले असतांनाही त्यांचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती.
पोलीस दोघांच्या मागावर असताना सासे रविवारी (दि.१३) दुपारी दुध बाजार येथील मुगल दरबार हॉटेल परिसरात तर जावरे शिवशक्तीनगर भागात मिळून आला. याबाबत अंमलदार जावेद शेख व गुरूदादा गांगुर्डे यानी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार शेळके व साळुंके करीत आहेत.