नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंद बंगला फोडून चोरट्यानी बेडरूममधील वार्डरोबमध्ये ठेवलेली तिजोरी चोरून नेली. या तिजोरीत ९० हजाराची रोकड, चांदीची नाणी, गॅस कार्ड व महत्वाचे कागदपत्र होते. ही घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद महादेव ठाकूर (रा. मुलूंड मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. ठाकूर यांचा पाथर्डी फाटा परिसरातील ब्ल्यू हॉटेल शेजारी बंगला असून या बंगल्यात ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याच्या खिडकी कशाने तरी उचकटून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यानी बंगल्याच्या वरिल मजल्यावरील बेडरूमच्या वार्डरॉबमध्ये ठेवलेली लोखंडी तिजोरी चोरून नेली.
या तिजोरीत ९० हजाराची रोकड ,तीन हजार रूपये किमतीचे चांदीचे नाणे,भारत गॅसचे पुस्तक व महत्वाचे कागदपत्र होते. ही घरफोडी शनिवारी (दि.१२) रात्री झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.