नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रात्रीच्या वेळी बसच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवासी महिलेचा रिक्षातील दोघांनी विनयभंग केल्याची घटना द्वारका परिसरात घडली. या घटनेत संशयितांनी जाब विचारण्याच्या रागातून सिटीबस चालक वाहक यांना मारहाण केली असून, दगडफेकून मारल्याने बसची काच फोडून नुकसान केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याबाबत भद्र्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार पिडीता गुरूवारी (दि.१०) रात्री दहा वाजेच्या सुमारास बोधलेनगर येथील बसथांब्यावर उभी असतांना ही घटना घडली. महिला बसची प्रतिक्षा करीत असतांना परिसरात उभ्या असलेल्या रिक्षातील चालक व त्याच्या समवेत असलेल्या एकाने महिलेचा विनयभंग केला. वेळोवेळी कुठे जायचे आहे असे विचारणा करीत दोघांनी अश्लिल हावभाव केले. महिलेने दुर्लक्ष केले. त्यानंतर भयभित झालेली महिला बसमधून प्रवास करीत असतांना संशयितांनी तिचा रिक्षातून पाठलाग केला. महिलेने ही बाब बसचालकाच्या निदर्शनास आणून दिली.
द्वारका भागात बस थांबवून चालकाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी चालक व वाहकास शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी महिले समोर नग्न होत तुला सोडणार नाही असे म्हणत बसवरही दगडफेक केली. या घटनेत बसची काच फुटल्याने नुकसान झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले असून अधिक तपास हवालदार यादव डंबाळे करीत आहेत.