नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राष्ट्रीय महामार्गावरुन धावणा-या ट्रक चालकांकडून एंन्ट्रीच्या नावावर ५०० रुपयांची लाच घेतांना नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षकासह तिघांना नाशिक येथील लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई नागपूर – रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील देवरी तालुक्यातील शिरपूर येथील सीमा तपासणी नाक्यावर करण्यात आली.
या कारवाईत मोटर वाहन निरीक्षक योगेश गोविंद खैरनार (४६) , नरेंद्र गडपायले (६३) आश्लेश विनायक पाचपोर (४५) असे आरोपींचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मालवाहतुकीच्या ट्रेंलर भंडारा देवरी मार्गे रायपूर कडे जात असतांना आरटीओ सीमा तपासणी नाका शिरपूर देवरी येथे आरोपी नरेंद्र गडपायले याने एंन्ट्रीच्या नावावर त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी करुन आश्लेश पाचपोर मार्फत आरोपी मोटर निरीक्षक खैरनार यांच्याकडे दिली. विशेष म्हणजे गडपायले व पाचपोर हे खासगी व्यक्ती असून खैरनार यांनी या दोघांनाही बेकायदेशीपणे आरटीओ सीमा तपासणी नाका येथे नेमले असल्याचे आढळून आले. या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार – पुरुष, वय – 32 वर्षे
आरोपी लोकसेवक नामे 1) योगेश गोविंद खैरनार, वय – 46 वर्षे, धंदा- नोकरी, मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण राहणार – फ्लॅट नंबर 107, पहिला मजला, रचना युथिका अपार्टमेंट, अमरावती रोड, पोस्टल कॉलनी जवळ, नागपूर.
आरोपी खाजगी इसम –
2) नरेंद्र मोहनलाल गडपायले, वय 63 वर्षे धंदा – खाजगी नोकरी, राहणार – बुद्ध विहारच्या मागे, नारायण लॉन्स जवळ, मराळटोली, आझाद वार्ड, गोंदिया.
3) आश्लेष विनायक पाचपोर, वय – 45 वर्ष, धंदा – खाजगी नोकरी – ड्रायव्हर, राहणार – गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेजच्या समोर, गाडगेबाबा मंदिराच्या मागे, गाडगे नगर, अमरावती.
*लाचेची मागणी.– ५०० रुपये.
*लाच स्विकारली – 500/- रू.
*लाचेची मागणी – दिनांक 11/04/2025
*लाच स्वीकारली – दिनांक 11/04/2025
*लाचेचे कारण :- यातील आरोपी खाजगी इसम क्रमांक 2 याने तक्रारदार यांच्या मालवाहतुकीचा ट्रेलर हा भंडारा देवरी मार्गे रायपूर कडे जात असताना RT0 सीमा तपासणी नाका,शिरपुर, देवरी येथे काहीएक कारण नसताना एन्ट्री द्यावी लागेल असे सांगून 500/- रुपये लाचेची मागणी करून मागणी केलीली लाचेची रक्कम स्वीकारून आरोपी क्रमांक 3 याच्या स्वाधीन केली व आरोपी क्रमांक 3 यास सदरील रक्कम लाचेची आहे याची जाणीव असताना त्याने ती स्वीकारून स्वतःच्या ताब्यात ठेवली. तसेच आरोपी लोकसेवक यास प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ( ग्रामीण ) यांच्याकडील का. आ. क्र. 193/astha/प्रापका/नाग/ ग्रा./2025/जा. क्र.1887 दिनांक 28/03/2025 रोजीच्या आदेशाअन्वये त्यांना इंटरसेप्टर -5 ( रस्ता सुरक्षा पथक ) येथे नेमलेले असताना प्रादेशिक परीवहन अधिकारी नागपूर ग्रामीण यांच्या मौखिक आदेशाने शिरपूर ,देवरी RTO सीमा तपासणी नाका येथे हजर राहून बेकायदेशीपणे आरोपी खाजगी इसम यांना शिरपूर ,देवरी RTO सीमा तपासणी नाका येथे नेमून मुंबई कोलकाता महामार्गाने जाणा-या मालवाहू वाहन चालकांकडून एनट्री च्या नावाखाली खाजगी इसम यांच्या मार्फत लाच रक्कमेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा. तीनही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असुन देवरी पोलीस ठाणे जि. गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
*सापळा अधिकारी – *श्री. संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक*
*सापळा पथक – पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे