नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भूखंड विकसकांकडून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुख सुविधा उपलब्ध करून न देता बांधकाम पूर्णत्वाचा दाखला हातात ठेवत ही फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायीक असलेल्या पाच भागीदारांसह लेखापरिक्षक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांचन डेव्हलपर्सचे मुकेश नवीनचंद जैन, दुर्गेश नवीनचंद्र शहा, सुकदेव नवीनचंद्र शहा, सुभाष हिरालाल बंब, आरती संजय छाजेड आदी भागीरांसह संजय धनराज छाजेड या सीए विरोधात पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधवी सतिश पगारीया (६० रा.थत्तेनगर,गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. पगारीया यांनी सीए छाजेड यांच्या माध्यमातून संशयितासमवेत कमर्शिअल भूखंड विकसीत करण्याचा व्यवहार केला होता.
कॉलेजरोड परिसरातील सर्व्हे नं. ७२४ -२ -५ पैकी प्लॉट नं. ५ यासी क्षेत्र ६६.६० चौमी यांसी नगर रचना योजना क्र. २ नुसार अंतिम प्लॉट नं.४८१ वरील कांचन अॅव्हेन्यू ही बिल्डींग उभारण्यात आली. यापोटी ७ कोटी ३ लाख ३ हजार ५०० रूपयांची रोकड धनादेशाद्वारे अदा करण्यात आली. मात्र संबधीतांनी बिल्डींगचे अपूर्ण बांधकाम व अर्धवट सोयी सुविधा असतांना संबधतांनी महापालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दाखवून फसवणुक केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक राजपूत करीत आहेत.