नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोकळया मैदानात चरणा-या दोन गायी चोरट्यांनी इनोव्हा कारमधून पळवून नेल्या. ही घटना हिरावाडीतील लोटेनगर भागात घडली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन चंद्रकांत लाटे (रा.लाटेनगर,हिरावाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लाटे गुरूवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास क्रिडा संकुल भागात मॉर्निग वॉक साठी गेले असता ही घटना त्यांचा निदर्शनास आली. दत्ताजी मोगरे क्रिडा संकुलनाच्या मोकळया मैदानात चरणा-या दोन गायी तीन जणांनी इनोव्हा कारमध्ये कोंबून पळवून नेल्या. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
धारदार शस्त्र घेवून फिरणा-यास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दिंडोरीरोड भागात राजरोसपणे धारदार शस्त्र घेवून फिरणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता व धारदार दोन चॉपर हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबू उर्फ अंकुश भवर परदेशी (१९ रा. राहूलवाडी,पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या शस्त्रधारीचे नाव आहे. दिंडोरीरोडवरील एमएसईबीच्या इमारतीजवळ फिरणाºया एका तरूणाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.१३) सायंकाळी पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या असता त्याच्या अंगझडतीत एक कोयता व दोन चॉपर मिळून आले. याबाबत अंमलदार रोहिणी भोईर यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार नांदुर्डीकर करीत आहेत.