नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्यावर जुगार खेळणा-या सहा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाई रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण बन्सी तनपुरे (रा.मॉडेल कॉलनी शिवाजीनगर जेलरोड), खंडू वाल्मिक लांडगे (रा.साईबाबानगर सिडको),विठ्ठल जानू वाघेरे (रा.श्रमिकनगर,सातपूर),तुषार रामदास लहरे (रा.गजानन चौक कोमटी लेन पंचवटी),रविंद्र केशव माळवे (रा.गजानन अपा.तवलीफाटा) व प्रविण एकनाथ कापडे (रा.सम्राटनगर,दिंडोरीरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत.
पंचवटीतील सिध्दी टॉवर या इमारतीसमोरील मोकळया जागेत काही जुगारी जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पंचवटी पोलीसांनी शुक्रवारी (दि.७) दुपारी छापा टाकला असता संशयित उघड्यावर टाईम मिलन नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. या कारवाईत १ हजार ३५० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार घनश्याम महाले यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार नाईक करीत आहेत.