नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोखंडेमळा परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण पुरूषोत्तम माहुरकर(रा.हनुमंतानगर २,लोखंडेमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. माहुरकर कुटूबिय शुक्रवारी (दि.२४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी ममाहुरकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लाकडी कपाटात ठेवलेली साडे आठ हजार रूपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे हवालदार हिवाळे करीत आहेत.
महिलेच्या पर्स मधील पाकिट चोरट्यांनी चोरले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खरेदी करून गर्दीतून रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या पर्स मधील पाकिट चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शालिमार ते ठाकरे गल्ली परिसरात घडली असून पाकिटात १९ हजाराची रोकड व सोन्याची पोत असा सुमारे ८० हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता अरूण गवई (रा.इंदिरा गांधी वसाहत लेखानगर) यांनी फिर्याद दिली आहे. गवई शनिवारी (दि.२५) खरेदी करण्यासाठी शालिमार भागात आल्या होत्या. शालिमार मेनरोड व ठाकरे गल्ली दरम्यान त्या खरेदी करीत असतांना ही घटना घडली. गर्दीतून रस्त्याने पायी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधील मिनी पाकिट हातोहात लांबविले. या पाकिटात १९ हजाराची रोकड व सोन्याची पोत असा सुमारे ७९ हजार रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.