मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उत्तराखंडाने समान नागरी संहिता लागू…उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला आनंद

by Gautam Sancheti
जानेवारी 27, 2025 | 11:45 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 32

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– उत्तराखंड राज्याने आज समान नागरी संहिता (युसीसी) प्रत्यक्षात लागू केल्याचा आनंद उप-राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला आहे. धनखड यांनी आज राज्यसभा अंतर्वासिता कार्यक्रमातील सहभागींच्या पाचव्या तुकडीसाठी उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह येथे आयोजित उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले तसेच त्यांनी या अंतर्वासिता कार्यक्रमासाठी सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन देखील केले.

यावेळी राज्यसभा अंतर्वासिता कार्यक्रमातील सहभागींना संबोधित करताना उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “आज एक अत्यंत शुभ चिन्ह ठरणारी घटना घडली आहे. आणि ते शुभ चिन्ह म्हणजे संविधान कर्त्यांनी संकल्पित केलेले आणि संविधानात निर्देशित केलेले, विशेषतः चौथ्या भागात – राज्यविषयक धोरणाबाबतची दिशादर्शक तत्वे- या भागात अंतर्भूत केलेले विषय. ही दिशादर्शक तत्वे वास्तवात साकार करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे निर्देश संविधान कर्त्यांनी राज्यांना दिले. त्यापैकी काही बाबी प्रत्यक्षात उतरवण्यात यश आले, मात्र कलम 44 प्रत्यक्षात साकार होणे ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानातील 44 वे कलम असा नियम सांगते आणि आदेश देते की संपूर्ण भारतभरातील नागरिकांसाठी समान नागरी संहिता लागू करण्यासाठी राज्ये प्रयत्न करतील. आपण सर्वजण आज अत्यंत आनंदी झालो आहोत. भारतीय संविधानाचा स्वीकार झाल्यानंतर आता देवभूमी उत्तराखंडने समान नागरी संहिता वास्तवात साकार केली आहे. देशातील एका राज्याने हे करून दाखवले आहे. उत्तराखंड सरकारने त्यांच्या राज्यात समान नागरी संहिता लागू करून संविधान कर्त्यांची संकल्पना वास्तवात आणण्यासाठी दाखवलेल्या दूरदृष्टीबद्दल मी या सरकारचे अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की येत्या काही काळातच संपूर्ण देश अशा प्रकारच्या कायद्याचा स्वीकार करेल.”

युसीसीला काही लोकांकडून होणाऱ्या विरोधाबाबत चिंता व्यक्त करत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “काही जण केवळ निष्काळजीपणामुळे यावर टीका करत आहेत. भारतीय संविधानाने निर्देशित केलेल्या एखाद्या गोष्टीवर आपण टीका कशी काय करू शकतो? आपल्या संस्थापक जनकांकडून आलेला आदेश आहे तो. लिंग समानता प्रस्थापित करण्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न आहे, त्याला आपण विरोध का करायचा? राजकारणाची पाळेमुळे आपल्या मनांमध्ये इतकी खोलवर रुजलेली आहेत की आता त्यातून विष निर्माण झाले आहे. राजकीय लाभासाठी लोक राष्ट्रवाद देखील सोडून द्यायला मागेपुढे पहात नाहीत, क्षणभर देखील त्याबद्दल चिंता न बाळगत नाहीत. समान नागरी संहितेच्या घोषणेला कोणीही विरोध कसे करू शकतो! तुम्ही त्याचा अभ्यास करा.संसदेत त्याबद्दल झालेल्या चर्चा अभ्यासा, अशी संहिता लागू करण्यासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने किती वेळा सूचित केले आहे ते देखील पहा.”

अवैध स्थलांतरीतांमुळे देशाच्या सुरक्षिततेला निर्माण होत असलेला धोका अधोरेखित करत उपराष्ट्रपती धनखड यांनी या संदर्भातील आव्हानांकडे लक्ष पुरवण्यावर अधिक भर देण्याची सूचना केली.

“भारत हा जगातील असा एकमेव देश ठरला आहे ज्याने गेल्या दशकभरात प्रचंड आर्थिक झेप, पायाभूत सुविधांचा जलदगती विकास, तंत्रज्ञानाची खोलवर पोहोच, तरुणांसाठी अत्यंत अनुकूल ठरणारी सहयोगात्मक धोरणे विकसित करून दाखवली आहेत आणि त्यातून आशा आणि शक्यतांचे वातावरण निर्माण झाले आहे,” उपराष्ट्रपती धनखड पुढे म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोखंडेमळा परिसरात घरफोडी…रोकड व सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास

Next Post

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराच्या रुग्णात वाढ…केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय बहु-शाखीय पथक महाराष्ट्रासाठी नियुक्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
INDIA GOVERMENT

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराच्या रुग्णात वाढ…केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय बहु-शाखीय पथक महाराष्ट्रासाठी नियुक्त

ताज्या बातम्या

GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
445

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीबाबत झाला हा मोठा निर्णय…

जुलै 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तीने खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, मंगळवार, ८ जुलैचे राशिभविष्य

जुलै 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011