नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रियकर व त्याच्या पत्नीच्या जाचास कंटाळून २८ वर्षीय विवाहीतेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात संगमनेर तालूक्यातील दाम्पत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवा तेलंग व सारिका तेलंग (रा.लोहारे निरपूर ता.संगमनेर,जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत ऋषिकेश खांडरे या युवकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व संशयित एकाच गावातील रहिवासी आहेत. नाशिकरोड येथील बनकर मळा भागात राहणा-या अर्चना प्रविण गोरे (२८) या विवाहीतेने शनिवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली.
प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप फिर्यादी भावाने केला असून तेलंग दांम्पत्याच्या जाचास कंटाळून बहिणीने आत्महत्या केल्या दावा करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण कोरडे करीत आहेत.