नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव शिवारातील हनुमान आणि श्रीरामनगर भागात भरदिवसा दोन घरफोड्या झाल्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला असून त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी वेगवेगळी नोंद करण्यात आली आहे.
पहिल्या घरफोडीबाबत गितांजली लक्ष्मण पगारे (रा.स्वामी इलाईट अपा.श्रीरामनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पगारे कुटूंबिय सोमवारी (दि.२५) सकाळी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजा कश्याच्या तरी सहाय्याने उघडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २८ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.
दुसरी घटना हनुमाननगर भागात घडली. याबाबत भास्कर दामू कांबरी (रा.गणेश वंदन अपा.पारस मणी गणपती मंदिराजवळ,हनुमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. कांबरी कुटूंबिय बुधवारी (दि.२७) दुपारी घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ११ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख १७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दोन्ही गुह्यांबाबत आडगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार मगर व राजुळे करीत आहेत.