नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात बंदी असतानाही शहरात राजरोसपणे गुटख्याची विक्री होत असल्याची पुन्हा एकदा समोर आले आहे. अशोका मार्ग भागातील खोडेनगर येथील एका बंगल्याच्या पार्किंगमधील जीन्याच्या अडोशाला ठेवलेला गुटख्याचा साठा पोलीसांच्या हाती लागला असून या कारवाईत सुगंधी सुपारी व तंबाखू असा सुमारे २ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी वडाळागावात साठवून केलेला सुमारे ६५ हजार रूपये किमतीचा साठा पोलीसांच्या हाती लागला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार इम्तीयाज जाफर तांबोळी (३६ रा.हाऊस मस्तीते हसन,श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी अशोका मार्ग खोडेनगर),दानिश सय्यद (रा.भारतनगर),रफिउद्दीन सय्यद (रा.किराणा अपा.विठ्ठल मंदिराजवळ) व वैभव मोराडे (रा.म्हसरूळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
खोडेनगर येथील श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी असलेल्या हाऊस मस्तीते हसन या बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या जीन्याच्या आडोश्याला मोठ्या प्रणाता गुटख्याचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि.१६) पथकाने छापा टाकला असता याठिकाणी सुगंधी तंबाखू व पानमसाला असा सुमारे २ लाख २९ हजार १२ रूपये किमतीचा साठा आढळून आला. चौकशीत संशयितांची नावे समोर आल्याने संबधीताविरोधात मानके कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.