नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुचाकी खरेदी विक्री व्यवहारात एकाने शोरूम चालकास एक लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. धनादेश न वटल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल रमेश कोपरे (रा.चिंचखेडरोड पिंपळगाव ब.ता.निफाड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत प्रतिक सुनिल पंडीत (रा.सदगुरूनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पंडीत झुलू या इलेक्ट्रीक स्कुटरचे वितरक असून त्यांचे मायको सर्कल भागात शोरूम आहे.
गेल्या १८ ऑगस्ट रोजी संशयित दुचाकी खरेदीसाठी शोरूममध्ये आला होता. दुचाकीची पसंतीनंतर त्याने स्कुटरचा व्यवहार केला. यावेळी संशयिताने काही रक्कम देत उवर्रीत रक्कम धनादेशाच्या माध्यमातून देणार असल्याची ग्वाही दिल्याने पंडीत यांनी त्याच्या ताब्यात दुचाकी सोपविली. मात्र धनादेश वटला नाही. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पंडीत यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार बहिरम करीत आहेत.