नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात घरा घरात श्री गणेशाची स्थापना झाली आहे.सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. गणेशोत्सवा निमित्त अनेक कलाकार आपल्या कल्पकतेने गणेशाचे चित्र, कलाकृती सादर करीत असतात. अशीच काहीसी आगळी वेगळी कलाकृती गणेशोत्सवा निमित्ताने नाशिकच्या वडगाव-पिंगळा येथील चित्रकार प्रदिप शिंदे यांनी बदामावर अष्टविनायकातील श्री गणेशाचे चित्र साकारले असून लहानशा बदामावर साकारलेले गणेशाची मनमोहक कलाकृती सर्वांचे आकर्षण ठरली असून अशा प्रकारे त्यांनी संपुर्ण अष्टविनायकातील गणेशाची कलाकृती साकारली आहे.