बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये पंचवटीत सेक्स रॅकेट चालवणा-या लॉजवर छापा… चार परप्रांतीय मुलींची सुटका

by India Darpan
ऑक्टोबर 12, 2024 | 4:50 pm
in क्राईम डायरी
0
Screenshot 20241012 163834 WhatsApp

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंचवटीत सेक्स रॅकेट चालवणा-या लॉजवर पोलिसांनी छापा टाकत चार परप्रांतीय मुलींची सुटका केली.विशेष म्हणजे पुणे येथील एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पंचवटी पोलिसांनी हा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईमध्ये पश्चिम बंगाल, गुजरात आणि झारखंड येथील चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर, लॉज मालक आणि मॅनेजर विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याअन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील प्रोग्राम असोसिएटस, फ्रिडम फर्म या संस्थेचे पदाधिकारी यांना नाशिकमध्ये पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांकडून बळजबरीने देहविक्री करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबतत्यांनी शुक्रवार ११ रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार एक पथक तयार करून पंचवटी परिसरातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल न्यू करवलीच्या पाठीमागे असलेल्या मधुबन लॉज येथे पथक पोहचले. यावेळी एक बनावट ग्राहक या लॉजमध्ये पाठविण्यात आले होते. या बनावट ग्राहकाने देहविक्री सुरु असल्याचा इशारा देताच पथकाने लॉजवर छापा टाकला. यावेळी याठिकाणी झारखंड, पश्चिम बंगाल आणि गुजरात येथून आणलेल्या चार
महिलांना ताब्यात घेतले. तसेच, या महिलांसोबत अय्याशी करण्यासाठी आलेल्या वरवंडी, ता. दिंडोरी आणि कुरी, ता. चांदवड येथील दोघा संशयितां
पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

देहविक्रीबाबत पीडित महिलांना विचारले असता लॉज मालक संशयित प्रवीण खर्डे यांनी आपल्याला साफसफाईच्या कामासाठी आणल्याचे सांगितले. मात्र, आम्ही परराज्यातील असल्याचा गैरफायदा घेत साफसफाईचे काम न देता आमच्याकडून देहविक्री करून घेत असल्याचे सांगितले. तसेच, आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन देहविक्री करून घेत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यावेळी पोलिसांनी याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कंडोम जप्त केले आहे. तसेच, संशयित लॉज मालक प्रवीण मधुकर खर्डे, रा. नाशिक आणि लॉज मॅनेजर मंटूकुमार सीताराम यादव, ३२, रा. मधुबन लॉजिंग, नाशिक, मूळ रा. काटाटोली, ता. जि. रांची, झारखंड यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), संदीप मिटके, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे मधुकर कड, नाशिक शहर व पंचवटी पोलीस स्टेशन यांनी सदरची कारवाई संयुक्तरित्या पार पाडली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२६ वर्षीय विवाहीतेवर बलात्कार…पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचे कृत्य

Next Post

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमीच्या निमित्ताने सुकना लष्करी तळावर जवानांसोबत केले शस्त्र पूजन

India Darpan

Next Post
PIC1W00X

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमीच्या निमित्ताने सुकना लष्करी तळावर जवानांसोबत केले शस्त्र पूजन

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011