नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– चेहडी पंपीग भागात पिस्तूल बाळगणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून गावठी कट्यासह जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत विनोदसिंग बाईयस (२६ रा.चेहडीपंपीग निवारा घरकुल नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
चेहडी पंपीग स्टेशन येथील दारणा नदीवरील बंधा-यावर असलेल्या एका तरूणाकडे पिस्तूल असल्याची माहिती नाशिकरोड पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास पथकाने धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे जीवंत काडतुसांनी भरलेला गावठी पिस्तूल मिळून आला. याबाबत अंमलदार विशाल कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हयाची नोंद करण्यात आली असू अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.
……….
२८ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाथर्डी फाटा परिसरातील दामोदरनगर भागात राहणा-या २८ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किसन सुशील वर्मा (रा.श्री रेसि.पांडूरंग चौक दामोदरनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. वर्मा याने रविवारी (दि.८) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. बेशुध्द अवस्थेत कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.