नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा नाका भागात देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर मुंबई नाका पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन जणांना पोलिसांना गजाआड केले असून पाच महिलांची सुटका केली आहे. एक आरोपी मात्र फरार झाला आहे. या कारवाईत ९ मोबाईलही जप्त करण्यात आले आहे. हॉटेल कोर्टयार्ड शेजारी असलेल्या एका बंगल्यात हा देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नकली ग्राहक पाठवून या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला.
शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय करण्यात येत असल्यामुळे पोलीस आयुक्तांनी कडक पावले उचलली आहे. गेल्या काही दिवसात शहरात अशा कारवाया केल्या जात असून त्यात देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला जात आहे. मुंबई नाका पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई केली आहे. या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदया नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime Massage Parlor Sex Racket Burst by Police