शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धक्कादायक! जात पंचायतीने अल्पवयीन गर्भवती वधूचा केला परस्पर घटस्फोट; त्र्यंबक तालुक्यातील प्रकार

by Gautam Sancheti
डिसेंबर 3, 2022 | 10:00 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा परस्पर घटस्फोट करण्याचा निर्णय जात पंचायतीने केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या मुलीने बाळाला जन्म दिला आहे. दोघेही सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर, या सर्व प्रकरणात जात पंचायतीसह संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जात पंचायत मुठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.

जात पंचायत मुठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव (धारेचीवाडी) येथील १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह झाला. इगतपुरी तालुक्यातील शिरसाणे (सपऱ्याची वाडी) येथील तरुणाशी तिची लग्नगाठ बांधण्यात आली. कोरोना काळ सुरू असतानाही या बालविवाह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोखला. तरीही हा विवाह झाला. सरकारी पातळीवर त्याची कुठलीही गांभिर्याने दखल घेण्यात आली नाही. एका रात्री मंदिरात हा विवाह करण्यात आला. अल्पवयीन वधू ही दोन महिने सासरी राहिली. त्यानंतर तिला माहेरी सोडून देण्यात आले. त्याचवेळी हे स्पष्ट झाले की, ही अल्पवयीन वधू गर्भवती आहे. वधूच्या कुटुंबियांनी ही बाब सासरकडच्यांना सांगितली. पण, त्यांनी वधूला परत सासरी आणण्यास नकार दिला.

दोन्ही कुटुंबियांची मध्यस्थी आणि मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले पण त्यात यश आले नाही. एवढ्या लवकर आपल्याला अपत्य नको, अशी भूमिका वरासह त्याच्या कुटुंबियांनी घेतली. तसेच, पाच आठवड्यांचा गर्भ असल्याने गर्भपातही अशक्य असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आता यावर तोडगा काढण्यासाठी थेट जात पंचायतीकडे धाव घेण्यात आली. धक्कादायक म्हणजे, जात पंचायतीने वधूला न्याय देण्याऐवजी थेट वराच्या बाजूने निकाल दिला. आणि १०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र केले. त्याचबरोबर वराला दुसरा विवाह करण्यास मान्यता दिली गेली. हे सर्व बेकायदेशीर असतानाही त्याबाबत फारशी वाच्यता झाली नाही. हे सर्व कमी म्हणून की काय, वधूने दर दुसरे लग्न केले तर वर पक्षाला (आताच्या नवऱ्याला) ५१ हजार रुपये भरपाई द्यावी, असे फर्मानही काढले.

जात पंचायतीचा हा जाच असतानाच गर्भवती मुलीची प्रसुती झाली. मात्र, प्रसुत झालेली महिला आणि बाळ हे दोघेही सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. बाळाचे वजन आणि बाळंतीणीची तब्ब्येत फारशी उत्तम नाही. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर हा मोठा आघात झाला आहे. या सर्वप्रकरणात जात पंचायतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी चांदगुडे यांनी केली आहे. तसेच, प्रसुत मुलीसह तिच्या बाळाचा संपूर्ण खर्च आणि देखभाल सरकारने करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा घटस्फोट जात पंचायतच्या पंचानी परस्पर केल्याचे समोर आले आहे. सदर घटनेला अनेक कांगोरे असले तरी जात पंचायतने घटस्फोट घडवून आणल्याचे दिसून येत आहे. अशी जात पंचायत बसवून न्याय निवाडे करणे कायद्याच्या विरोधात आहे. म्हणून संबधित जात पंचायत वर गुन्हे दाखल व्हावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.”
– कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, जात पंचायत मूठमाती अभियान

Nashik Crime Jat Panchayat Illegal Divorce

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या, साप्ताहिक राशिभविष्य ४ ते ११ नोव्हेंबर २०२२

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – त्यांचा काहीच उपयोग नसतो

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
Next Post
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण - विचार पुष्प - त्यांचा काहीच उपयोग नसतो

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011