नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) येथील एटीएममधून जर तुम्ही पैसे काढत असाल तर सावधान. कारण, तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. या परिसरात वारंवार फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. आताही अशीच एक घटना समोर आली आहे.
सीबीएस येथील स्टेट बॅकेच्या एटीएम केंद्रात एटीएम पीन जनरेट करण्याच्या बहाण्याने परप्रांतीयाने ४० हजाराला गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोनुकुमार पंचानंद सनगही (अमरपुर, बनसेर भागलपूर बिहार) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुबाई पुंडलिंक चौधरी (वय ५२, समर्थनगर, नाशिक) या ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान सीबीएस येथील स्टेट बॅकेच्या एटीएम केंद्रात गेल्या. त्यावेळी तेथे त्यांना नवीन एटीएम कार्डाचे पिन जनरेट करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएम कार्डाची आदलाबदल करीत त्यांच्या कार्ड वापरुन ४० हजार रुपये स्वताच्या खात्यात काढून फसविले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.