नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅरेजच्या पायरीवर बसलेल्या मालकास अज्ञात टोळक्याने हल्ला करीत बेदम मारहाण केल्याची घटना जेलरोड येथील शिवाजीनगर भागात घडली. या घटनेत दगड आणि जवळ पडलेली पेटी डोक्यात मारण्यात आल्याने गॅरेज मालक जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश दशरथ मुळे (५५ रा.वसंत विहार, मॉडेल कॉलनी, जेलरोड) असे जखमी गॅरेज मालकाचे नाव आहे. मुळे यांचे शिवाजीनगर येथील देशमुख भवनसमोर शिवप्रसाद नावाचे गॅरेज आहे. बुधवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास आपल्या गॅरेजच्या पायरीवर बसलेले असतांना ही घटना घडली. अचानक आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने कुठलेही कारण नसतांना त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत टोळक्यातील एकाने जवळच पडलेली लोखंडी पेटी उचलून त्यांच्या डोक्यात व तोंडावर मारली तर मुळे बचावासाठी पळण्याचा प्रयत्न करीत असतांना दुसºयाने त्यांना दगड मारून जखमी केले. या घटनेत मुळे याचे तीन दात पडले असून नाकाखालील हाडास दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुलगा अनिकेत मुळे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस त्रिकुटाचा शोध घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक काकड करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1634470951617445888?s=20
Nashik Crime Beaten Video CCTV Footage