गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धक्कादायक! लैंगिक अत्याचारानंतरही आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी नाही

by Gautam Sancheti
एप्रिल 27, 2023 | 6:38 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठ तालुक्यातील भुवन येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत अधीक्षक राहुल सुरेश तायडे याने सातवीतील मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांनी बहिणीवर अत्याचार झाल्याचे भावाला समजले. तोपर्यंत आश्रमशाळेच्या अधिक्षिका, मुख्याध्यापक व पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. १५ दिवस होवूनही तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी व सहआरोपींवर सक्त कारवाई करावी, अशी मागणी उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

भुवन (ता.पेठ, जि.नाशिक) येथील आदिवासी आश्रम शाळेत ९ एप्रिल २०२३ रोजी सातवीमध्ये शिकणार्‍या मुलीवर वसतिगृहाच्या कर्मचार्‍याने अत्याचार केल्याचा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी व सहआरोपीवर सक्त कारवाई करावी. त्यांना जामीन मिळणार नाही, यासाठी चांगले विधीज्ञ देण्यात यावे. वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍यांकडे तपासाचे काम सोपवण्यात यावे. पीडितचे मानसिक समुपदेशन करण्यात करून तिला मनोधेर्य योजनेतून तात्काळ मदत करावी.

पीडित मुलीस अन्य शासकीय आदिवासी आश्रमशाळेत स्थलांतरीत करावे. तक्रार घेण्यास विलंब करणार्‍या, पीडित मुलीचे जबाब बदलणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. आरोपी कर्मचारी व त्यास मदत करणारे आश्रमशाळेतील कर्मचारी व मुख्याध्यापक यांना सेवेतून बडतर्फ करावे. घटना घडून 8 दिवस होईपर्यंत तिच्या पालकांना अवगत न करणार्‍या व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या शाळेतील अन्य कर्मचारी शिक्षक, मुख्याध्यापक, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनाही प्रकरणात सहआरोपी करावे.

पीडित मुलीचा उच्चशिक्षण होईपर्यंतच्या सर्व खर्चाची तरतूद शासनाने विशेष बाब म्हणून करावी. कारण शासनाच्या परिरक्षणात असलेल्या अल्पवयीन पीडितेचे संरक्षण करण्यास शासकीय यंत्रणा असमर्थ ठरली आहे. या आश्रम शाळेत मागील वर्षभरात कोण-कोणत्या अधिकार्‍यांनी भेटी व आश्रम शाळेच्या केंद्र तपासण्या केल्या व त्यांच्या तपासणीची गुणवत्ता तपासण्यात यावी. राज्य शासनाच्या सर्व आदिवासी, सामाजिक न्याय, उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण व शासनाच्या अनुदानातून चालवण्यात येणार्‍या सर्व महिला व मुलींच्या वसततिगृहात असे प्रकार होणार नाहीत, यासाठी प्रतिबंधात्मक योजना आखाव्यात. प्रत्येक पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या अशा सर्व वसतिगृहांना त्या-त्या पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रत्येक 15 दिवसांतून एकदा भेट देऊन तेथील विद्यार्थीनींसोबत संवाद साधावा.

याबाबतच्या भेटीचा अहवाल राज्यस्तरावर संकलित करण्यात यावा. मुली व महिलांच्या वाहतूक करणार्‍या स्कूल बसेस रिक्षा व इतर वाहने यांच्या वाहन चालकाची वार्षिक चारित्र्य पडताळणी पोलीस ठाणेमार्फत करण्यात यावी. या वसतीगृहामध्ये व खासगी व्यक्तीमार्फत चालविण्यात येणार्‍या मुली व महिलांच्या सर्व वसतिगृहांचाही समावेश करावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, महिला व बालविकास आयुक्त, पुणे, आदिवासी विकास आयुक्त, नाशिक, परिवहन आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत.

मुलीला न्याय देण्याचे निर्देश
पीडित मुलीने न्यायालयासमोर जबाब सुरु असताना बलात्कार केल्याचे सांगितले आहे. पेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी संवेदनशीलपणे तक्रार नोंदवली नाही. पोलिसांनी तिला घाबरविले आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याशी बोलणे झाले असून, या प्रकरणाची चौकशी करावी, असे सांगितले आहे. ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला, त्याच्यांवर कारवाई करावी. पीडित मुलीला दुसर्‍या आदिवसी आश्रमशाळेत स्थलांतरीत करावे. मनोधैर्य योजनेतून मदत मिळावी. आरोपीस जामीन मिळाला असला तरी पोलिसांनी जामीन रद्दसाठी प्रयत्न करावेत. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणात दररोज पीडित मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क असून, मुलीला न्याय मिळावा, यासाठी संबंधितांना निर्देश दिले आहेत.

Nashik Crime Ashramshala girl Medical Check Up

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत; दाखल दिल्लीत महाराष्ट्र सदनात सहकार्य कक्ष

Next Post

मनमाडला विद्युत कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण सुरु

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतील ऑगस्टचा सन्मान निधी तुमच्या खात्यात जमा झाला का? चेक करा बँक खाते

सप्टेंबर 11, 2025
crime1
क्राईम डायरी

नाशिकच्या महिलेसह तिघांना सव्वा कोटीला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 11, 2025
Untitled 10
संमिश्र वार्ता

यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड…१२ ठिकाणी छापे, ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

सप्टेंबर 11, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

भारत – पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी याचिका…सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

सप्टेंबर 11, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै…भारत – पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन

सप्टेंबर 11, 2025
Next Post
IMG 20230427 WA0151 e1682579240635

मनमाडला विद्युत कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण सुरु

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011