India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत; दाखल दिल्लीत महाराष्ट्र सदनात सहकार्य कक्ष

India Darpan by India Darpan
April 27, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुदानमध्ये अंतर्गत संघर्षामुळे तेथील नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावे लागत आहे. यात काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. भारत सरकारच्या विशेष विमानांनी रात्री 360 भारतीय नागरिक दिल्लीत दाखल झाले असून, यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून यातील तीन नागरिकांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.

सद्या सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे अशांततेचा वातावरण सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने एकूण 360 भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे.

केंद्र शासनाचा विशेष विमान एसवी-3620 जेड्डाह (सौदी अरब) येथून बुध्वारी रात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विशेष विमान दाखल झाले. यात, महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता.

महाराष्ट्र सदनाद्वारे तीन नागरिकांना स्वगृही सुखरूप परत
सुदान मधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य
दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वयाचे कार्य होत आहे. विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या नागरिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत तीन नागरिक सुखरूप स्वगृही परतले आहेत.

सुदाननमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील नागरिकांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

Maharashtra 5 Persons Return from Sudan


Previous Post

खोले मळ्यात वृद्धेचे चेनस्नॅचिंग तर सातपूर कॉलनीत तरुणीचा मोबाईल लांबवला

Next Post

धक्कादायक! लैंगिक अत्याचारानंतरही आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी नाही

Next Post
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक! लैंगिक अत्याचारानंतरही आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी नाही

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group