नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. जुने नाशिक परिसरातील नानावली भागात शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद उर्फ इल्लू श्रीकृष्ण चौधरी (३० रा.भगवतीनगर,भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. इल्लू चौधरी याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर व जिह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
पोलीस त्याच्या मागावर असतांनाच मंगळवारी (दि.१३) सायंकाळी नानावलीतील घोडके सराफ दुकान परिसरात तो युनिट १ च्या पथकाच्या हाती लागला. याबाबत अंमलदार मुक्तार शेख यानी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार साळुंखे करीत आहेत.