सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न…

by India Darpan
ऑगस्ट 16, 2024 | 12:04 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240815 WA0796


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सेवा- सुविधा मिळतील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात नाशिकला एज्युकेशन हब बनविण्याच्या दृष्टीने सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. दिंडोरी तालुक्यातील मौजे शिवनई येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, हेमलता बीडकर, अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. संपत काळे, बाकेराव बस्ते, राजेंद्र भांबर, प्रशांत सूर्यवंशी, प्रा. चिंतामणी निगळे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, विद्यापीठाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून बहुप्रतिक्षेत असणारे नाशिक उपकेंद्र हे पूर्णत्वास जात आहे ही आनंदाची बाब आहे. 31 हजार स्क्वेअर फुटाचे 3 मजली भव्य मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मागील 2 वर्षातील काळात उभे राहिले आहे. या ठिकाणी आज 63 एकर जागेला संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. या वर्षात येथे एमबीए व बीबीए रिसर्च सेंटर सह टेंपल मॅनेजमेंट हे कोर्स सुरू होणार असून उत्तर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ही मोठी भर पडणार आहे. सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, संस्था प्राध्यापकांची कामे या ठिकाणी झाल्यास हे केंद्र जिल्ह्यातील 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. तसेच या कामी पुणे येथे जाण्याचे श्रम वाचून नाशिककरांच्या वेळ व पैशाची बचत होईल व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचाही ताण कमी होईल, असे मत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी याप्रसंगी मांडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिकाधिक जोडण्याच्या दृष्टीने आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच आमदार, खासदार निधीसह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी निर्णय घेवून यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शैक्षणिक विभागाच्या इमारती, रस्ते व मुलभूत विकासाच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. तसेच येत्या महिनाभरात या उपकेंद्राचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मला मिळालेले तीन हजार तीन लाखासारखे…नाशिक जिल्ह्यातील लाभार्थीं महिलांबरोबर मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

Next Post

नाशिक शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Next Post
fir111

नाशिक शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011