नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रात्री उशीरा दारू न दिल्याने सात ते नऊ टवाळखोरांनी हॉटेल बार मालकासह येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या मारहाणीत हॉटेलमधील वेटर जखमी झाला आहे. या घटनेनंतर मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी सात संशयतांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यातील दोन संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती एमआयडीसी चौकीचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे यांनी दिली आहे.
पाथर्डी फाटा पासून अंबड गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील हॉटेल महाराजांमध्ये रात्री उशिरा दारू न दिल्याने सात ते आठ टवाळखोरांनी हॉटेल बार मालकासह येथील काम करणाऱ्या चार ते पाच कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेची तक्रार फिर्यादी भागिनाथ भास्कर लोखंडे यांनी केली.
त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी बार मालकास व कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या गणेश आहेर (२६) मनीष हिवाळे (२६) विवेक वाघ (२५) सागर बाविस्कर (२४) निखिल खैरनार (२३) गणेश आहेर, संजोग देसाई हे सर्व राहणार अंबड व सिडको येथील आहे. या संशयतांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.