शनिवार, जुलै 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाचे बांधकामबाबत झाला हा मोठा निर्णय

by Gautam Sancheti
सप्टेंबर 4, 2024 | 11:57 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240903 WA0335 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणारे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय, त्याच्याशी संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय आणि महाराष्ट्र पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या इमारतीचे बांधकाम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जलद्गतीने पूर्ण करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. यासाठीचा ६० टक्के खर्च राज्य शासन तर ४० टक्के खर्च आरोग्य विज्ञान विद्यापीठ करेल. निधीअभावी बांधकाम रखडणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय आणि महाराष्ट्र पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या इमारतींच्या ३४८ कोटींच्या बांधकाम खर्चास नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या कामाचा प्रकल्प अहवाल, आराखडा, अंदाजपत्रका राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले होते. मात्र त्यावेळी हे काम केंद्राचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या एचएससीसी कंपनीला देण्यात आले. याला दीड वर्षांहून अधिक काळ होऊनही एचएससीसी कंपनीने बांधकामास सुरुवात केली नाही. त्यामुळे अधिक विलंब टाळून हे काम जलदगतीने होण्यासाठी हे काम आता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्याचा आणि त्यांच्या माध्यमातून प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.

मंत्रालयात झालेल्या बैठकीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश सोळंके, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, आरोग्य विद्यान विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, समीर भुजबळ आदींसह शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय, ४३० खाटांचे रुग्णालय आणि महाराष्ट्र पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या इमारतींच्या बांधकामास दीड वर्षापूर्वी प्रशासकीय मंजूरी मिळूनही हे काम अद्याप सुरु न झाल्याची बाब निराशाजनक व गंभीर असल्याचे सांगत हे बांधकाम तातडीने सुरु करून जलदगतीने पूर्ण करण्याची आवश्यकता मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. त्यामुळे अधिकचा विलंब टाळण्यासाठी हे काम बांधकाम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. वैद्यकीय पदवी शिक्षणाची जबाबदारी राज्य शासन तर पदव्यूत्तर शिक्षणाची जबाबदारी विद्यापीठ पार पाडेल. यासाठीच्या प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार करावा त्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले.

कोल्हापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास
लवकरच उच्चाधिकार समितीची मान्यता मिळवणार

कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय,२५० खाटांचे अतिविशिष्ट उपचार रुग्णालय, २५० खाटांचे कर्करोग उपचार रुग्णालयाच्या बांधकामास गती देण्याबाबतही आजच्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, अत्याधुनिक उपचार यंत्रणा उपलब्ध करणे, अनुषंगिक सोयीसुविधांच्या वाढीव खर्चास मान्यतेसाठी उच्चाधिकार समितीसमोर जाण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. ही कार्यवाही एका आठवड्यात पूर्ण करण्याचेही बैठकीत ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकांमुळे नाशिक आणि कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि अन्य आरोग्य सुविधांचा प्रश्न मार्गी लागण्यास गती मिळाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात विनयभंगाच्या दोन घटना…पोलिसांनी केली ही कारवाई

Next Post

रात्री उशीरा दारू न दिल्याने हॉटेल बार मालकासह कामगारांना बेदम मारहाण…सात जणांवर कारवाई

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधिक फोटो

रात्री उशीरा दारू न दिल्याने हॉटेल बार मालकासह कामगारांना बेदम मारहाण...सात जणांवर कारवाई

ताज्या बातम्या

crime 1111

मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच….तीन दुचाकी वेगवेगळया भागातून चोरीला

जुलै 12, 2025
Untitled 16

मुंबई, गोवा, पुणे आणि चेन्नई येथील पंधरा ठिकाणी ईडीचे छापे…२०० कोटीची मालमत्ता जप्त

जुलै 12, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक व मानसिक छळ प्रकरणावर विधानपरिषदेत लक्षवेधी

जुलै 12, 2025
vidhanbhavan

राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर वर्गवारीनुसार होणार कारवाई

जुलै 12, 2025
jasuraksha

राज्यात ३,३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले; भोंग्यांच्या दंडातील अर्धी रक्कम तक्रारदाराला

जुलै 12, 2025
विधानसभा लक्षवेधी ३ 2 1 1024x512 1

शनि शिंगणापूर देवस्थानमधील आर्थिक अनियमिततेबाबत दोषींवर फौजदारी गुन्ह्यांचे आदेश

जुलै 12, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011