नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात विनयभंगाचे प्रकार सुरूच असून, रविवारी (दि.१) वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघीचा विनयभंग करण्यात आला. त्यात अल्पवयीन मुलीसह एका महिलेचा समावेश आहे. पोलीसांनी तात्काळ दोन परिचीतांना बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळागावात राहणारी अल्पवयीन पीडिता रविवारी रात्री आपल्या घर परिसरातून जात असतांना परिचीत असलेल्या संशयिताने तिला गाठले. यावेळी संशयिताने मोबाईल नंबरची मागणी करीत माझे घरी कोणी नाही तू घरी ये असे म्हणत मुलीचा विनयभंग केला. ही बाब मुलीने घरी जावून आपल्या कुटुंबाला कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
दुसरा प्रकार टाकळीरोडवरील गांधीनगर भागात घडला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी (दि.२) सकाळी ती टाकळीरोडने पायी जात असतांना संशयिताने तिची वाट अडविली. यावेळी आय लव यू असे म्हणत संशयिताने तिचा विनयभंग केला. महिलेने याबाबत पोलीसात धाव घेतल्याने संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बकाल करीत आहेत.