गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

टाकळी शिवारात चोरट्यांनी १ लाख ६४ हजाराचे वायर बंडल चोरून नेले, गुन्हा दाखल

by India Darpan
ऑगस्ट 14, 2024 | 12:22 am
in क्राईम डायरी
0
fir111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्टोअर रूम फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६४ हजाराचे वायर बंडल चोरून नेले. ही घटना आगर टाकळी शिवारातील बिष्णोई प्लाझा भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुषण सुरेश देवरे (रा.श्रीकृष्ण अव्हेन्यू,बनकर चौक काठेगल्ली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देवरे यांच्या नवीन साईटचे काम मुक्ताई हॉस्पिटल परिसरात चालू आहे. या साईटवरील स्टोअररूमच्या दरवाजाचे कुलू तोडून चोरट्यांनी ही चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी गेल्या बुधवारी (दि.७) रात्री स्टोअररूमचे कुलूप तोडून सुमारे १ लाख ६४ हजार रूपये किमतीचे वायर बंडल चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.

चाकू घेऊन फिरणा-या अल्पवयीन मुलावर पोलीसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-शाळा परिसरात चाकू घेऊन फिरणा-या अल्पवयीन मुलावर पोलीसांनी कारवाई केली. संशयिताच्या ताब्यातून धारदार चाकू हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दामिनी पथकाच्या कर्मचारी सुजाता वाळूंज यानी याबाबत फिर्याद दिली आहे. सेंट फिलोमिना शाळा भागात एका मुलाकडे धारदार चाकू असल्याची माहिती नाशिकरोड दामिनी पथकाला मिळाली होती. पथकाने धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून चाकू हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गोसावी करीत आहेत.

३० वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कामटवाडा भागात राहणा-या ३० वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संतोष बाळू दोंदे (रा.गोपाल चौक कामटवाडे) असे मृत युवकाचे नाव आहे. दोंदे याने सोमवारी (दि.१२) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच काका भाऊसाहेब जाधव यांनी त्यांस तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार टिळेकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नव्या बांधकाम साईटवरून चोरट्यांनी चार लाख रूपये किमतीच्या सेंट्रींग प्लेटा चोरल्या

Next Post

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या नूतन वास्तूचे मुंबईत उद्घाटन

Next Post
hasan 1 1536x1024 1

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या नूतन वास्तूचे मुंबईत उद्घाटन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011