रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या नूतन वास्तूचे मुंबईत उद्घाटन

by India Darpan
ऑगस्ट 14, 2024 | 12:28 am
in संमिश्र वार्ता
0
hasan 1 1536x1024 1

मुंबई (इंडिया दर्पण वृ्त्तसेवा)- फार्मासिस्ट आणि सामान्य नागरिकांसाठी नवनवीन उपक्रम हाती घेऊन औषध व्यवसाय परिषद एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या मुलुंड येथील नूतन वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री श्री.मुश्रीफ बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, परिषदेने मुलुंड येथे स्वमालकीची जागा खरेदी करुन यामध्ये अत्याधुनिक सेवा देणारे कार्यालय, जागतिक स्तराप्रमाणे विकसित औषध माहिती केंद्र आणि फार्मासिस्टचे ज्ञान व कौशल्य याचे निरंतर प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले सभागृह बनविले आहे. हे राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. फार्मासिस्टचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी व जागतिक स्पर्धेला स्पर्धेनेच उत्तर देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाची निर्मिती करून कार्यशाळा राज्याच्या तालुका, जिल्हा पातळीवर तज्ञ मार्गदर्शकामार्फत आयोजित केल्या जातात हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे.कारण अपडेट असणे काळजी गरज आहे ते तुम्ही करता.यामुळे परिषद अधिक गुणवत्तापूर्ण काम करेल अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

आज अखेर महाराष्ट्र राज्यामध्ये ४७९ पदविका (Diploma) आणि ३१२ पदवी (Degree) व फार्म. डी. (Doctor of Pharmacy) ची ७ शासन मान्य फार्मसीची कॉलेज कार्यान्वित आहेत. कायद्याअंतर्गत फार्मसीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- विद्यार्थीनी फार्मसीचा व्यवसाय करणे, उत्पादन क्षेत्रामध्ये महत्वपुर्ण भुमिका बजावणे यासह सरकारी, निमसरकारी सेवा (फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर, फार्मसी इन्स्पेक्टर) करण्यासाठी नियम व अटींच्या आधीन राहून पंजीकरण (नोंदणी) करणे अनिवार्य आहे. आज अखेर ४.३ लाख फार्मासिस्टची नोंदणी परिषदेकडे झाली आहे.

परिषदेचे मागील २५ वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजना कार्यान्वित केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवली आहे. १९९८ मध्ये परिषदेने संकेतस्थळाची निर्मिती करुन कालानुरुप परिषदेचे सर्व कामकाज नोंदणी, पुर्नर्नोदणी, नूतनीकरण, इ. कामकाज ऑन लाइन पद्धतीने करण्यात येते.

फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रोफाइल (पी.पी.पी. कार्ड) ची नवीन संकल्पना अंमलात आणून त्याचे स्मार्टकार्डमध्ये रूपांतर केले आहे. यास अन्न आणि औषध प्रशासनाने देखील मान्यता दिली आहे. फार्मासिस्ट, औषध क्षेत्रातील संशोधक, प्राध्यापक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि नागरीकांना औषधाची माहिती, त्याचे शरीरावर होणारे अनुकूल व प्रतिकूल परिणाम, रासायनिक बदल बाबतची योग्य माहिती मिळू लागली आहे. यासाठी जगप्रसिद्ध Micromedex या डाटाबेसची उपलब्धता केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टाकळी शिवारात चोरट्यांनी १ लाख ६४ हजाराचे वायर बंडल चोरून नेले, गुन्हा दाखल

Next Post

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

Next Post
Untitled 40

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

ताज्या बातम्या

ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011