नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असो., मर्यादित नाशिकची सन 2023-2028 ची निवडणूक विश्वास ठाकूर, अजय ब्रम्हेचा, डॉ.शशीताई अहिरे, दत्ता गायकवाड, नानासाहेब सोनवणे व राजेंद्र (नाना) सुर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली बिनविरोध पार पडली. यात खालील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत
नाशिक (शहर) –
विश्वास जयदेव ठाकूर (विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक), नानासाहेब संतपराव सोनवणे (जनकल्याण को-ऑप बँक लि., नाशिक), वसंत दगडू खैरनार (गोदावरी अर्बन को-ऑप बँक लि., नाशिक), हेमंत हरीभाऊ धात्रक (नाशिक मर्चंटस् को-ऑप बँक लि., नाशिक), डॉ. शशीताई भगवान अहिरे (नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि., नाशिक), दत्ता नामदेव गायकवाड (नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नाशिक), अशोक श्रीकिसनजी झंवर (श्री महेश को-ऑप बँक लि., नाशिक), अशोक तेजमल तापडीया (बिझनेस को-ऑप बँक लि., नाशिक), सुनिल ताबाजी गिते (नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक, नाशिक), शरद किसनराव कोशिरे (श्री गणेश सहकारी बँक लि., नाशिक)
नाशिक (ग्रामीण) –
अजय जव्हेरीलाल ब्रम्हेचा (लासलगांव मर्चंटस् को-ऑप बँक लि.) राजेश शांतीलाल भांडगे (येवला मर्चंटस् को-ऑप बँक लि.), संजय श्रीधर वडनेरे (मनमाड अर्बन को-ऑप बँक लि.), हिरालाल सुरजकरण सुराणा (प्रगती अर्बन को-ऑप बँक लि.), नितीन एकनाथ वालखेडे (कळवण मर्चंटस् को-ऑप बँक लि.), कैलास हरी येवला (सटाणा मर्चंटस् को-ऑप बँक लि.), शरद नामदेव दुसाने (मालेगांव मर्चंटस् को-ऑप बँक लि.), राजेंद्र नामदेव सुर्यवंशी (देवळा मर्चंटस् को-ऑप बँक लि.), महेंद्र किसनलाल बोरा (वणी मर्चंटस् को-ऑप बँक लि.) राजकुमार चंपालाल संकलेचा (चांदवड मर्चंटस् को-ऑप बँक लि.) हे बिनविरोध निवडून आलेत. मनोज पांडूरंग गोडसे (श्री समर्थ को-ऑप बँक लि., नाशिक) व मिर्झा सलीमबेग जब्बारबेग (दि फैज मर्कंटाईल को-ऑप बँक लि., नाशिक) या दोघांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. तथापि, त्यांना विशेष निमंत्रित म्हणून घेण्यात येत आहे.
नाशिक जिल्हा नागरी बँक्स् असोसिएशन ही संस्था नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांमध्ये समन्वय साधणारी संस्था आहे. सहकार क्षेत्रातील नव-नवीन ध्येय-धोरणांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान विषयी जागरूकता आणण्यासाठी व त्याची उपयुक्तता व्यवस्थापनाला आणण्यासाठी असोसिएशन प्रयत्न करत असावे. ही सलग तिसरी बिनविरोध झालेली निवडणूक आहे. नाशिक जिल्हा नागरी बँक्स् असोसिएशनतर्फे डिसेंबर 2023 मध्ये राज्यस्तरीय ‘सहकार परिषदेचे’ आयोजन करण्यात येणार असून त्यात नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व बँकिंग क्षेत्रातील तज्ञ उपस्थित राहणार आहे, असे परिषदेचे निमंत्रक श्री.विश्वास ठाकूर यांनी सांगितले.