रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

by India Darpan
जून 20, 2023 | 8:56 pm
in राष्ट्रीय
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दि.१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. यामध्ये पूर्व -पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालय – विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, पुनरीक्षण-पूर्व उपक्रम कार्यक्रमात मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच, नवीन आयटी ॲप (IT Application) आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण दि. 01 जून, 2023 (गुरुवार) पासून ते दि. 20 जुलै, 2023 (गुरुवार) असेल, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दि. 21 जुलै, 2023 (शुक्रवार) ते दि. 21 ऑगस्ट, 2023 (सोमवार), मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे; तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे दि. 22 ऑगस्ट, 2023 (मंगळवार) ते दि. 29 सप्टेंबर, 2023 (शुक्रवार) नमुना 1-8 तयार करणे, 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे, दि. 30 सप्टेंबर, 2023 (शनिवार) ते दि. 16 ऑक्टोबर, 2023 (सोमवार) असा कार्यक्रम आहे.

पुनरीक्षण कार्यक्रमात एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि. 17 ऑक्टोबर, 2023 (मंगळवार), दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 17 ऑक्टोबर, 2023 (मंगळवार) ते दि. 30 नोव्हेंबर, 2023 (गुरुवार), विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधी, मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे, दि. 26 डिसेंबर,2023 (मंगळवार) पर्यंत, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 01 जानेवारी, 2024 (सोमवार) पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे दि. 05 जानेवारी, 2024 (शुक्रवार) दि.21 जुलै, 2023 ते 21 ऑगस्ट, 2023 या कालावधीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेट देऊन पडताळणीसाठी त्यांच्या संबंधित यादी भागात असलेल्या सर्व मतदारांचा तपशिल घेण्यात येईल. या कार्यक्रमाकरिता प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सोबत एक बूथस्तरीय एजंट (BLA), नियुक्त करण्याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विनंती करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नोंदणी न केलेले पात्र मतदार (01 ऑक्टोबर, 2023 रोजी पात्र असलेले),संभाव्य मतदार (01 जानेवारी, 2024 रोजी पात्र होणारे),संभाव्य मतदार (पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र होणारे), एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती ही माहिती गोळा करणार आहेत.

अर्जदार नमुना अर्ज क्र. ६ व नमुना अर्ज क्र. ८ भरताना त्याच्याकडे आधार कार्ड क्रमांक असल्यास स्वेच्छेने आधार कार्ड क्रमांक नमूद करेल. तथापि, आधार कार्ड क्रमांक कळविला नाही किंवा उपलब्ध करुन देण्यास असमर्थता दर्शविली या कारणास्तव मतदार यादीत नोंदणीसाठीचा अर्ज नाकारण्यात येणार नाही किंवा मतदार यादीतील नोंद वगळण्यात येणार नाही. भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या कार्यक्रमानुसार, मतदार नोंदणी अधिकारी नमुना अर्ज क्र. 5 मध्ये नोटीस जारी करून वर्षाच्या चारही अर्हता दिनांकावर आधारीत दावे व हरकती सादर करता येईल. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. सन २०२३ पासून 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. १७ ऑक्टोंबर, २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. १७ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ हा कालावधी मतदार नोंदणीचा तसेच नावासंबंधी काही हरकती असल्यास हरकती घेण्याचा आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.महिला आणि दिव्यांग,वंचित घटकांसाठी, तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत.मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राज्यात सध्या वयोगटनिहाय अंदाजे असलेली मतदार संख्या आणि प्रत्यक्षात दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार नोंदणी केलेली संख्या पुढीलप्रमाणे आहे.
१८ ते १९ वयोगटातील ४२,९८,७५६ असून प्रत्यक्ष नोंद ७९,९२,२१०,
२० ते २९ वयोगटातील २,२८,५४,६९३ प्रत्यक्ष नोंद १,६४,०५,१८१,
३०-३९ वयोगटातील मतदार २,१५,६०,६४३ प्रत्यक्ष नोंद २,०५,४४,४८०,
४० ते ४९ वयोगटातील मतदार १,७३,७४,०१० प्रत्यक्ष १,९८,४०,२४३

५० ते ५९ वयोगटातील मतदार १,३०,०२,२१९ प्रत्यक्ष १,४८,१७,६९१
६० ते ६९ वयोगटातील मतदार ८२,०५,५९३ प्रत्यक्ष नोंद ९५,८९,५३१
७० ते ७९ वयोगटातील मतदार ४९,१९,०३५ प्रत्यक्ष नोंद ५३,२१,६२८
८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मतदार १८,४०,२६६ प्रत्यक्ष नोंद २९,८४,०९८
वरील सर्व वयोगटातील एकूण मतदार ९,४०,५५,२१७ असून दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार ९,०३,०२,०६२ इतक्या मतदारांची नोंद झालेली आहे. नव्याने होणाऱ्या या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार वाढ अपेक्षित आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संतापजनक! वसतीगृहातील विद्यार्थिनींना पर्यटकांसमोर नाचवलं… त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Next Post

दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

Next Post
election 2

दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011