बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मंत्रालयात नको येथेच करा तक्रार; आतापर्यंत १८०० अर्ज निकाली

by Gautam Sancheti
सप्टेंबर 13, 2022 | 6:02 pm
in स्थानिक बातम्या
0
WhatsApp Image 2022 09 13 at 1.01.42 AM 1

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्यांचे प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षाच्या स्थापनेपासून नाशिक विभागातून 1 हजार 908 तक्रार अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 1 हजार 808 अर्जांवर समर्पक कार्यवाही करुन निकाली काढण्यात आले आहेत. तसेच शंभर अर्ज क्षेत्रीय स्तरावर विविध कारणास्तव प्रलंबित आहेत. प्रलंबित अर्जांवर स्वतंत्र मासिक बैठक उपायुक्त स्तरावर घेण्यात येते, अशी माहिती रमेश काळे उपायुक्त महसूल तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांनी दिली.

लोकाभिमुख प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतात. विभागीय स्तरावरील सर्व खाते प्रमुखांच्या उपस्थितीत प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात येतो. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील तळमजल्यावर 20 जानेवारी, 2020 रोजी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

20 जानेवारी, 2020 ते 09 सप्टेंबर, 2022 या कालावधीत नाशिक विभागाच्या विविध ठिकाणांहून, मुख्यमंत्री यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज, निवेदने, तक्रार अर्ज असे एकूण 1 हजार 908 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1538 अर्ज क्षेत्रीय कार्यालयांकडे पाठविण्यात आले, 370 अर्ज मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आणि 1438 अर्ज क्षेत्रीय कार्यालयाकडून समर्पक उत्तरे देऊन निकाली काढली आहे. नाशिक विभागातील क्षेत्रीय कार्यालयांच्या अर्जांपैकी पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषि विभाग, जिल्हा परिषद, भूमी अभिलेख, विभागीय सहनिबंधक कार्यालय या स्तरावरील जास्त निवेदन व तक्रारींचे प्रमाण असते. प्रलंबित प्रकरणांचा आढावा विभागीय लोकशाही दिन, भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांच्या समक्ष घेतला जाऊन प्रकरणाचा पाठपुरावा केला जातो.

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा
सर्वसामान्य माणसाला त्याचे दैनंदिन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईला जावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचावेत या हेतूने हा कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्याचबरोबर क्षेत्रीय पातळीवरचे प्रश्न क्षेत्रीयस्तरावरच सुटावेत, या प्रक्रियेला वेग मिळावा, ही त्यामागची भूमिका आहे. सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात, असे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु झाल्याने सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. त्यांना क्षेत्रीय स्तरावरचे प्रश्न घेऊन मुंबईला येण्याची आता गरज पडत नाही. मा.मुख्यमंत्री यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज, निवेदने संदर्भ आता या विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात स्विकारले जात आहेत.

येथे करावा संपर्क
कार्यालयाचा पत्ता – विशेष कार्य अधिकारी, नाशिक विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, पहिला मजला, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड, नाशिक, पिन-422101
दूरध्वनी क्र- 0253-2462401.

Nashik CMO Office 1800 Complaint Resolve

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेना मनमाड शहर प्रमुखपदाचा मयुर बोरसे यांनी दिला राजीनामा

Next Post

१०० महिलांनी नवश्या गणपती मंदिरात केले अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनाचे पठण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
Next Post
IMG 20220913 WA0037 1 e1663074576398

१०० महिलांनी नवश्या गणपती मंदिरात केले अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनाचे पठण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011