नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या काही भागात उद्या, बुधवारी (१ फेब्रुवारी) पाणी पुरवटा होणार नाही. तशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे. जलवाहिनीची गळती दुरुस्ती करण्याचे काम होणार असल्याचे हा पाणी पुरवटा बाधित होणार आहे.
महानगरपालिका हद्दीतील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथून प्रभाग क्रमांक 27, 25, 26( भागश:) मधील जलकुंभ भरणे आणि पाणी वितरणाकरीता 900 मिमी व्यासाच्या पीएससी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबड जवळ 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. सदरचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने नवीन नाशिक विभागातील खालील नमूद ठिकाणी बुधवारी दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच गुरुवारी दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी केले आहे.
खालील भागात पाणीपुरवठा बंद राहणार
प्र.क्र. 24 कालिका पार्क उंटवाडी परिसर
प्र. क्र. 25 इंद्रनगरी पवन नगर माऊली लॉन्स सावता नगर त्रिमूर्ती चौक कोकण भवन परिसर कामटवाडे गाव व परिसर
प्र.क्र. 26 मोगल नगर, साळुंके नगर, वावरे नगर, शिवशक्ती नगर व चौक आयटीआय परिसर, खुटवड नगर, मटाले नगर, आशीर्वाद नगर, संजीव नगर, जाधव संकुल पाटील, पार्क विरार संकुल
प्र.क्र. 27 अलीबाबा नगर, दातीर वस्ती, अंबडगाव, हुजेफा फर्निचर, ग्लोबल शाळा व परिसर
प्र. क्र. 28 लक्ष्मी नगर, अंबड गाव ते माऊली वृंदावन नगर, माऊली लॉन्स परिसर अंबड गाव परिसर, लॉन्स साई, ग्रामनगर, उपेंद्र नगर, महाजन नगर सहावी स्कीम
प्र. क्र. 29 भाद्रपद सेक्टर आझाद पंछी परिसर, शनी मंदिर परिसर, मोरवाडी गाव व इतर परिसर
Nashik City Water Supply Wednesday 1 February