नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आज अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार शहराच्या काही भागात येत्या गुरुवारी (३ नोव्हेंबर) पाणी पुरवठा होणार नसल्याचे विभागाने सांगितले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना उद्याच म्हणजे बुधवारी, २ नोव्हेंबर पाणी साठवून ठेवावे लागणार आहे.
नाशिक रोड विभागातील जलशुद्धीकरण येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंड मधील गोदावरी जलकुंभ भरणारी पंपाची (मुख्य उर्ध्ववाहीनी) पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे. सदर गळतीचे काम करण्यासाठी खालील प्रभागातील एक दिवसाचा पाणी पुरवठा बंद करणे आवश्यक आहे. त्यानुसार खालील प्रभागामध्ये पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नाही. गुरुवार, ३ नोव्हेंबरचा सायंकाळचा पाणी पुरवठा खालील प्रभागात होऊ शकणार नाही व शुक्रवार, ४ नोव्हेंबर सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची येथील नागरीकांनी नोंद घ्यावी आणि मनपास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
पाणी पुरवठा बाधित होणारा भाग असा
प्रभाग क्र 17- कॅनोल रोड परीसर, नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा.,दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर, भिमनगर परिसर
प्रभाग क्र.18- शिवाजी नगर,मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर.
प्रभाग क्र.19- गोरेवाडी,
प्रभाग क्र.20- पुनारोड परीसर, राम नगर, विजय नगर, शाहु नगर, लोकमान्य नगर, मोटवाणी रोड, कला नगर, आशा नगर, जिजामाता नगर
Nashik City Water Supply Thursday 3 November
NMC Municipal Corporation