नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील पाणी पुरवठ्या बाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या मंगळवारी (१५ मार्च) शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा बाधित होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिका पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी विभागाअंतर्गत पेठ रोड गंगापूर डावा तट कालव्याजवळ, दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनी लिकेज झाली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. हे काम येत्या मंगळवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.1 मधील शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै), , तसेच प्र.क्र. 6 मधील चांदशी रोड, गंगावाडी रोड, फडोळ मळा, रामकृष्ण नगर, पिंगळे नगर, एरिकेशन कॉलनी, मानकर नगर, महालक्ष्मी नगर, स्वामी विवेकानंद नगर, मानकर मळा, तवली डोंगर परिसर, कल्याणी व राजेय सोसा, मेहेरधाम, गॅस गोडावून, यशोदानगर, पेठरोड, इत्यादी परिसरात मंगळवारचा दुपारचा आणि सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.
प्रभाग क्र.1 मधील दुर्गा नगर, शिव समर्थ नगर, जुई नगर, ओंकार बंगला परिसर शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै.) व प्र क्र 4 मधील कॅन्सर हॉस्पीटल मागील परिसर, अनुसयानगर, कर्णनगर, समर्थनगर तुळजाभवानी नगर व हमालवाडी परिसर, पवार मळा परिसर तसेच प्र.क्र.6 मधील मखमलाबाद गांव, मखमलाबाद रोड पश्चिम भाग, मातोश्री नगर, विद्या नगर, वडजाई माता नगर, महादेव कॉलनी, कोळी वाडा, घाडगे नगर, एरिगेशन कॉलनी (पै.), मानकर नगर (पै.), जयमल्हार कॉलनी, अश्वमेघ नगर, सप्तरंग सोसा. इत्यादी परिसरात बुधवारी (१६ मार्च) सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे.
नाशिक महानगरपालिका नाशिक
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रीकी विभाग (पाणी पुरवठा विभाग)
जाहीर निवेदन@my_nmc #watercut #nmc #waterdepartment #nashicity pic.twitter.com/SIseJb7Uzi— mynmc (@my_nmc) March 11, 2022