India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिककरांनो, इकडे लक्ष द्या! या दिवशी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

India Darpan by India Darpan
May 17, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण, येत्या शनिवारी म्हणजेच २० मे रोजी  संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तशी माहिती नाशिक महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे तुम्हाला येत्या शुक्रवारी म्हणजे उद्याच (१९ मे) पाणी भरुन ठेवावे लागणार आहे.

नाशिक महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के. की वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे करणे करीता विज वितरण कंपनीमार्फत शनिवार दि. २०/०५/२०२३ रोजी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही.

तसेच मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणेत येतो, सदरचे जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

सबब सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा दि. २०/०५/२०२३ रोजी बंद ठेवून अनु. क्र. १ व २ मधील नमुद दुरुस्ती कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाचे मनपाचे गंगापुर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा *शनिवार दि. २०/०५/२०२३ रोजीचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवार दि.२१/०५/२०२३ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल* याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे अशी विनंती अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) यांनी केली आहे.

Nashik City Water Supply Closed NMC


Previous Post

पीओपीच्या गणेश मूर्तींबाबत राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next Post

मुख्याध्यापकानेच केला शालकाचा खुन; नांदगाव शहरातील धक्कादायक घटना

Next Post
प्रातिनिधिक फोटो

मुख्याध्यापकानेच केला शालकाचा खुन; नांदगाव शहरातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, २९ मे २०२३चे राशिभविष्य

May 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २९ मे २०२३

May 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचे बर्थडे गिफ्ट

May 28, 2023

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group