नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात उद्यापासून (२० जानेवारी) मध्यवर्ती भागात वाहतुकीमध्ये बदल होणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आली आहे. आता हे काम गंजमाळ ते त्र्यंबकनाका या भागात केले जाणार आहे. या कारणास्तव आता त्र्यंबकनाका ते गंजमाळ सिग्नल या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. म्हणजेच, गंजमाळ सिग्नलकडून त्र्यंबकनाका कडे येताना असणारी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. जलवाहिनीचे हे काम ६७ दिवस चालणार आहे. त्यामुळे पुढील ६७ दिवस हा मार्ग एकेरीच असणार आहे. यासंदर्भात शहर पोलिस वाहतूक शाखेने आदेश काढले आहेत. हे आदेश खालीलप्रमाणे