नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर खेळाडू असाल आणि शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षात असाल तर तुमच्यासाठी नामी संधी आहे. कारण, नाशिक महापालिकेच्यावतीने तुम्हाला थेट १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळू शकते. क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र खेळाडुंना अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मनपाच्या संकेतस्थळावर त्यासाी अर्ज उपलब्ध आहेत.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सन 2019 ते 2022 या चार वर्षात 76 खेळाडुंनी मनपाच्या क्रीडा शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला प्रतिसाद मिळाला आहे. ज्या खेळाडूंनी विविध मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. अशा खेळाडूंसाठी मनपाने तीन क्रीडा शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजना सुरू केल्या आहेत.
1. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा शिष्यवृत्ती अर्थसहाय्य
2. राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा शिष्यवृत्ती अर्थसहाय्य
3. राज्यस्तरावरील क्रीडा शिष्यवृत्ती अर्थसहाय्य
या योजना अंतर्गत खालीप्रमाणे वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे
आंतरराष्ट्रीय स्तर
1) प्रथम क्रमांक 1,00,000/-
2) द्वितीय क्रमांक 75,000/-
3 तृतीय क्रमांक 50,000/-
राष्ट्रीय स्तर
1) 25,000/
2) 15,000/
3) 10,000/
राज्यस्तर
1) 7000/-
2) 5000/-
3) 3000/-
मनपा मुख्यालयात अर्ज पाठवावा
या वार्षिक योजनेच्या अटी व शर्ती आणि योजनेचा नमुना फॉर्म महानगरपालिकेच्या www.nmc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पात्र खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदरचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह रजिष्टर किंवा स्पिड पोष्टाद्वारे उपायुक्त (समाज कल्याण), क्रीडा विभाग, राजीव गांधी भवन, तळ मजला, शरणपुर रोड, नाशिक-2 या ठिकाणी पाठवावा लागणार आहे. प्राप्त होणा-या अर्जामध्ये अपूर्णत: असल्यास अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही, यांची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे उपायुक्त नितिन नेर यांनी केले आहे. मनपाच्या क्रीडा विभागातील कर्मचारी आनंद भालेराव हे सुद्धा खेळाडूंना या योजनेची माहिती देण्यासाठी कार्यालयात उपलब्ध आहेत. मा. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाने शिष्यवृत्ती योजना राबवली आहे.
2019 ते 2022 पर्यंतचे लाभार्थी
1 ) शिष्यवृत्ती प्रकार-आंतरराष्ट्रीय
रक्कम 1,75,000/
खेळाडूंची संख्या – 2
2) शिष्यवृत्ती प्रकार – राष्ट्रीय रक्कम – 4,45,000
खेळाडूंची संख्या – 25
3) शिष्यवृत्ती प्रकार – राज्यस्तरीय रक्कम – 2,61,000
खेळाडूंची संख्या – 49
*एकुण रक्कम – 8,81,000*
*एकूण खेळाडूंची संख्या – 76*
जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत लाभार्थ्यांची नावे
*राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीधारक खेळाडू*
1) साक्षी बंडू ताठे – धनुर्विद्या- 25,000/-
2) ईशांत राहुल सोनवणे- ज्युदो-10,000/-
3) शियाशंकर लालवाणी- साईकलिंग 10,000/-
4)गौरी सुनिल गर्जे – पोहणे 25,000/-
5 ) स्वयंम प्रतिमकुमार बढे- ॲथलेटिक्स -15,000/-
राज्यस्तरावरील शिष्यवृत्तीधारक खेळाडू
1) प्रतिक्षा उमेश कराड -ज्युदो 3000/-
2) सार्थक बाबासाहेब कांबळे- ज्युदो 3000/-
3 )आकांक्षा संदिप शिंदे -ज्युदो 7000/-
4) ईशिता राहुल सोनवणे – ज्युदो 5000/-
5 )वैष्णवी प्रकाश जगदाळे – युनिफाईड 3000/-
Nashik City Sports Scholarship 1 Lakh Rupees
Municipal Corporation